13 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor Play 3e, जाणून घ्या किंमत

या महिन्याच्या सुरवातीला चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये Honor 3 Play लॉन्च केला होता. आता कंपनीने चुपचाप या हँडसेटचा दुसरा वर्जन Honor Play 3e चीन मध्ये लॉन्च केला आहे. चला जाणून घेऊया बजेट कॅटगरी मध्ये सादर केल्या गेलेल्या या फोन बद्दल मध्ये सर्वकाही.

वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल डिस्प्ले सह Honor Play 3e कंपनीने CNY 699 (जवळपास 7,000 रुपये) मध्ये सादर केला आहे. हि किंमत फोनच्या 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज मॉडलची आहे. तर 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 899 (जवळपास 9,000 रुपये) आहे. डिवाइस कंपनीने ब्लॅक, गोल्ड आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. हँडसेट चीनच्या ई-कॉमर्स साइट VMall वरून विकत घेता येईल.

हे देखील वाचा: 4जी डाउनलोड स्पीड मध्ये Jio पुन्हा एक नंबर, वोडाफोन ने इथे मारली बाजी

Honor Play 3e चे स्पेसिफिकेशन्स

Honor Play 3e बद्दल बोलायचे तर यात 5.71-इंचाचा HD+ (720×1520 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. याची पिक्सल डेंसिटी 294ppi आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 2GHz मीडियाटेक हीलियो P22 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोन मध्ये 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम ऑप्शन सह 32 जीबी व 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच फोन एंडरॉयड पाई-बेस्ड EMUI 9.1 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.

हे देखील वाचा: Google Pixel 4 आणि Pixel 4 XL येतील 15 ऑक्टोबरला समोर, कंपनीने शेयर केले इनवाइट

फोटोग्राफी साठी Honor Play 3e च्या मागे 13 मेगापिक्सल रियर सेंसर f/1.8 अपर्चर सह आणि वीडियो कॉलिंग व सेल्फी साठी फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेंसर आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये ब्लूटूथ v4.2, वाई-फाई 802.11 b/g/n, यूएसबी ओटीजी, जीपीएस + GLONASS इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here