4जी डाउनलोड स्पीड मध्ये Jio पुन्हा एक नंबर, वोडाफोन ने इथे मारली बाजी

टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा नवीन सरासरी 4G डाउनलोड स्पीडचे आकडे जाहीर केले आहेत. यावेळी ट्राईने ऑगस्ट महिन्याचे आकडे जाहीर केले आहेत, ज्यात रिलायंस जियोने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ऑगस्ट मध्ये जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 21.3 एमबीपीएस होता जो जुलै मध्ये 21 एमबीपीएस होता. याचा अर्थ असा कि एका महिन्यात जियोने 0.3 एमबीपीएस स्पीड वाढवला आहे.

कंपनीने 4जी डाउनलोड स्पीड मध्ये हे स्थान मिळवण्याची हि पहिली वेळ नाही. याआधी पण कंपनी 8 महिने 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत टॉपला राहिली आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2018 मध्ये मध्ये पण रिलायंस जियो स्पीडच्या बाबती सर्वात वेगवान 4जी ऑपरेटर होती. 2018 मध्ये बाराही महिने जियोचा 4जी सरासरी डाउनलोड स्पीड सर्वात जास्त होता.

TRAI ने प्रकाशित केलेल्या आकड्यांनुसार ऑगस्ट मध्ये भारती एयरटेलचा 4जी डाउनलोड स्पीड 8.2 एमबीपीएस नोंदवण्यात आला आहे. याआधी जुलै मध्ये हा स्पीड 8.8 एमबीपीएस, एप्रिल मध्ये 9.5 एमबीपीएस, मे मध्ये 9.3 एमबीपीएस आणि जून मध्ये 9.2 एमबीपीएस होता. या आकड्यांच्या आधारवर असे म्हणता येईल कि एयरटेलच्या 4जी डाउनलोड स्पीड मध्ये घसरण होत आहे.

हे देखील वाचा: Google Pixel 4 आणि Pixel 4 XL येतील 15 ऑक्टोबरला समोर, कंपनीने शेयर केले इनवाइट

दूसरी ओर वोडाफोन आणि आइडिया सेल्युलरने यांचे विलीनीकरण झाले आहे आणि आता वोडाफोन आइडिया नावाने काम चालू पण ट्राई दोन्हीचे आकडे वेगवेगळे दाखवते. आइडियाने ऑगस्ट मध्ये 4जी डाउनलोड स्पीड 6.1 एमबीपीएस नोंदवला आहे. तर वोडाफोन नेटवर्कच्या सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड मध्ये कोणताही बदल नाही. जुलै प्रमाणे ऑगस्ट मध्ये पण वोडाफोनचा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड 7.7 एमबीपीएस आहे.

इथे वोडाफोनने मारली बाजी

जियो सरासरी 4जी डाउनलोड स्पीड मध्ये टॉपला आहे तर ऑगस्ट मध्ये 5.5 एमबीपीएस सह वोडाफोन सरासरी 4 जी अपलोड स्पीडच्या यादीत सर्वात वर आहे. वोडाफोनचा अपलोड स्पीड जुलैच्या तुलनेत कमी आहे. जुलै मध्ये वोडाफोनचा 4जी अपलोड स्पीड 5.8 एमबीपीएस होता.

हे देखील वाचा: OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर

आइडिया आणि एयरटेलचा ऑगस्ट मध्ये सरासरी 4जी अपलोड स्पीड क्रमशः 5.1 एमबीपीएस आणि 3.1 एमबीपीएस होता. दोघांचाही सरासरी 4 जी अपलोड स्पीड काहीसा कमी झाला आहे. तर Jio ने 4.4 एमबीपीएस सरासरी 4जी अपलोड स्पीड देत सुधारणा दाखवली आहे.

ट्राई सरासरी स्पीडची माहिती रियल टाइम आकड्यांच्या आधारावर देते. जे ट्राईच्या माईस्पीड ऍपच्या मदतीने गोळा केले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here