Google Pixel 4 आणि Pixel 4 XL येतील 15 ऑक्टोबरला समोर, कंपनीने शेयर केले इनवाइट

अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि Google आपल्या फोनची नवीन सीरीज Pixel 4 आणि Pixel 4 XL वर काम करत आहे, जे कंपनी यावर्षी अक्टूबर पर्यंत लॉन्च करू शकते. आता कंपनीने ऑफिशियली माहिती दिली आहे कि 15 ऑक्टोबरला न्यूयॉर्क मध्ये Google Event 2019 चे आयोजन केले जाईल. या इवेंट मध्ये पुढील Pixel सीरीज लॉन्च केली जाऊ शकते.

Google ने यासाठी मीडिया इंवाइट पाठवायला सुरवात केली आहे. हा इवेंट पुढल्या महिन्यात 15 ऑक्टोबरला आयोजित केला जाईल. या इवेंट मध्ये Pixel 4, Pixel 4 XL व्यतिरिक्त Google चे इतर प्रोडक्ट्स पण लॉन्च केले जाऊ शकतात.

पिक्सल 4 सीरीजच्या स्मार्टफोन्स सोबत या इवेंट मध्ये कंपनी Pixelbook 2, Google Home speakers चे पुढील जेनरेशन लॉन्च करू शकते. 15 ऑक्टोबरला होणारा इवेंट Made by Google नावाने प्रमोट केला जात आहे.

हे देखील वाचा: OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर

काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि Pixel 4 सीरीजच्या फोन्स मध्ये एक नवीन फीचर येईल जो पहिल्यांदाच पिक्सल डिवाइस दिसेल. या फीचर्स बद्दल गूगल म्हणते कि कंपनी अनेक दिवसांपासून यांच्यावर काम करत आहे, जो आता पर्यंत ‘Soli’ प्रॉजेक्ट नावाने ओळखला जात आहे.

मोशन सेंसर संबंधित फीचर आधी सोनी एरिक्सन फोन्स मध्ये पण आला आहे. गूगलच्या नवीन टेक्नॉलजीच्या मदतीने यूजर्स आपला फोनला स्पर्श न करता वापरू शकतील. कंपनीने ब्लॉग पोस्ट मध्ये लिहिले आहे कि Pixel 4 सोली सह येणारा पहिला डिवाइस आहे, जो नवीन मोशन सेंसर फीचर सह येईल. या फीचर्सच्या मदतीने यूजर्स गाणी बदलणे, अलार्म बंद करणे आणि फोन कॉल साइलेंट करणे अशी कामे फक्त आपल्या हातच्या इशाऱ्याने करू शकतील.

स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार Google Pixel 4 मध्ये 1,080 x 2,280 पिक्सल रिजोल्यूशन वाला डिस्प्ले असेल. Pixel 4 XL मध्ये 1,440 x 3,040 पिक्सल असलेला डिस्प्ले असेल. अपकमिंग गूगल फ्लॅगशिप फोन मध्ये5जी असेल. असे बोलले जात आहे कि पिक्सल डिवाइस मध्ये 128जीबी स्टोरेज दिली जाईल. दुसऱ्या स्टोरेज वेरिएंटची माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधीच समोर आली डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेलेल्या Vivo V17 Pro ची किंमत, 20 सप्टेंबरला आहे भारतातील लॉन्च

Google Pixel 4 आणि Pixel 4 XL बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये क्वाॉलकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगॉन 855 Plus चिपसेट असेल. फोन एंडरॉयड 10 वर चालेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here