हुआवईच्या सब-ब्रँड कंपनी ऑनर ने नवीन वर्षाची सुरवात आपल्या आर्कषक आणि दमदार स्मार्टफोन ऑनर व्यू 20 ने केली होती. ऑनर ने व्यू 20 चा स्वरुपात आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन सादर केला होता, जो फक्त लुकनुसार आकर्षक नसणं स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीती पण ताकदवान आहे. ऑनरने हा फोन पॅरिस मध्ये लॉन्च केला होता त्यानंतर हा आज भारतात पण आला आहे. ऑनर चा हा शानदार स्मार्टफोन ऑनर व्यू 20 आज भारतात लॉन्च झाला आहे.
ऑनर ने व्यू 20 स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. फोनच्या 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर ऑनर व्यू 20 चा 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वेरिएंट 45,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. ऑनर व्यू 20 कंपनी ने अमेझॉन एक्सक्लूसिव ठेवला आहे. हा फोन उद्यापासूनच या वेबसाइट वर आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध होईल.
व्यू 20 कंपनीचा पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला फोन आहे. फोनच्या डिस्प्ले वर उजवीकडे एक छोटासा होल देण्यात आला आहे आणि याच छिद्रात सेल्फी कॅमेरा आहे. व्यू 20 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या 6.4-इंचाच्या डिस्प्ले वर सादर केला गेला आहे जो 1080×2310 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कंपनी ने आपला फोन लेयरने प्रोटेक्ट केला आहे.
ऑनर व्यू 20 एंडरॉयड 9.0 पाई आधारित मॅजिक यूआई 2.0.1 वर सादर केला गेला आहे जो 7एनएम ऑक्टा-कोर प्रोसेसर सह हाइसिलिकॉन किरीन 980 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-जी76 एमपी10 जीपीयू देण्यात आला आहे. फोनचा एक वेरिएंट 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम मेमरी सह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ऑनर व्यू 20 जगातील पहिला 48-मेगापिक्सल एआई कॅमेरा असलेला फोन आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर तसेच 12-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसिंग व 3डी डिटेक्शन टेक्नलॉजी असलेला सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 25-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
ऑनर व्यू 20 च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा फोन 4जी वोएलटीई सह डुअल सिमला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी ऑनर व्यू 20 मध्ये फास्ट चार्जिंग असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
















