अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये लोकेशन सर्व्हिसचा वापर कसा करायचा, जाणून घ्या इथे

स्मार्टफोनमध्ये लोकेशन सर्व्हिस किंवा जीपीएस (Global Positioning System) एक उपयुक्त फीचर आहे. त्यामुळे फक्त डिवाइसचं अचूक लोकेशन समजत नाही तर हे फीचर नेव्हिगेशन (रास्ता दाखवण्यात) देखील मदत करतो. जीपीएस रिसिव्हर असलेला कोणताही डिवाइस अचूक जियोलोकेशनची माहिती देतो. GPS चं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे गुगल मॅप्स, अ‍ॅपल मॅप्स आहेत, जिथे मॅपवर तुम्ही रियल टाइममध्ये कुठे आहात हे समजतं. चला जाणून घेऊया अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये जीपीएस म्हणजे लोकेशन सर्व्हिस ऑन करण्याची पद्धत.

अँड्रॉइड डिवाइसवर ‘लोकेशन’ ऑन करण्याची पद्धत

तुम्ही अँड्रॉइड डिवाइसवर लोकेशन दोन पद्धतीनं ऑन करू शकता:

1. क्विक टॉगलनं ‘ऑन’ करा लोकेशन

  • अँड्रॉइड डिवाइसवर लोकेशन सर्व्हिस वापरण्यासाठी नोटिफिकेशन ट्रे ची मदत घेऊ शकता. क्विक टॉगल (quick toggle) साठी नोटिफिशन ट्रे खाली स्वाइप करा. हे फीचर अँड्रॉइड 6 पासून सर्व अँड्रॉइड डिवाइसमध्ये आहे.
  • आता क्विक टॉगलमध्ये ‘लोकेशन’ (Location) चा ऑप्शन दिसेल, जे तुमचं GPS बटन आहे. जीपीएस किंवा लोकेशन सर्व्हिसचा वापर करण्यासाठी इथून ‘लोकेशन’ वर टॅप करून ते ऑन करा.
  • जर तुम्ही लोकेशन डिसेबल किंवा ऑफ केलं तर तुमचं ‘लोकेशन’ ट्रॅक होण्यापासून रोखू शकता.

2. सेटिंग से लोकेशन को करा ‘ऑन’

  • लोकेशन किंवा जीपीएस सर्व्हिस ऑन करण्यासाठी Android डिवाइसमध्ये सेटिंग अ‍ॅप ओपन करा.
  • सेटिंग अ‍ॅपमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करून ‘लोकेशन’ सेक्शन शोधा.
  • एकदा लोकेशन सेक्शन मिळालं की त्यावर टॅप करून लोकेशन सर्व्हिस ऑन किंवा ऑफ (Settings > Location) करता येते.

iPhone वर लोकेशन सर्व्हिस कशी ‘ऑन’ करायची

आयफोनवर लोकेशन किंवा जीपीएस सर्व्हिस वापरण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • स्टेप 1: सर्वप्रथम आयफोन सेटिंगमध्ये जा.
  • स्टेप 2: सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्योरिटी सर्व्हिस मध्ये जा.
  • >

  • स्टेप 3: इथे तुम्हाला लोकेशन सर्व्हिस टॉगल दिसेल, जो ऑन करावा लागेल. (Settings > Privacy & Security > Location Services> On/Off)

त्यानंतर आयफोनवर लोकेशन सर्व्हिस ऑन होईल. त्यानंतर ज्या अ‍ॅप्सना तुमच्या लोकेशनचा अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे, ते त्वरित लोकेशन अ‍ॅक्सेस करू लागतील.

जीपीएस म्हणजे काय?

जीपीएस (GPS) चा फुलफॉर्म ‘ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम’ आहे. ही एक अशी प्रणाली आहे जी जीपीएस रिसिव्हरची स्थिती जाणून घेण्यासाठी उपग्रह आणि रेडियो टेक्नॉलॉजीचा वापर करते. ही टेक्नॉलॉजी 1960 च्या दशकात अमेरिकेत विकसित करण्यात आली होती. तेव्हा ही सॅटेलाइट नेव्हिगेशनसंबंधित प्रयोगांसाठी विकसित करण्यात आली होती. त्यानंतर 1978 मध्ये अमेरिकन संरक्षण विभागाने उपग्रहांचं एक नेटवर्क लाँच केलं. जेव्हा अमेरिकन संरक्षण विभागाचा Selective Availability प्रोग्राम साल 2000 मध्ये संपला तेव्हा ही सर्व्हिस व्यक्तीगत आणि व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होईल.

लोकेशन सर्व्हिसची उपयुक्तता

लोकेशन सर्व्हिस तुमच्या फोनचे ठिकाण निर्धारित करते. गुगल मॅप्स, फाइंड माय फोन इत्यादी अ‍ॅप तुमच्या फोनच्या लोकेशनचा वापर करून हे सांगतात की तुम्हाला कुठे ड्राईव्ह करायचं आहे, तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला फोन कुठे आहे, तुम्हाला नजीकचे रेस्टॉरंट कुठे आहेत? सर्व लोकेशन सेवांचा आधार जीपीएस असतो.

अ‍ॅप्स लोकेशन अ‍ॅक्सेस मागतात तेव्हा काय करायचं?

लोकेशन सेवा वापरणारे अ‍ॅप्स पहिल्यांदा वापरताना लोकेशनची परवानगी मागू शकतात. तेव्हा त्या अ‍ॅपला तुमच्या लोकेशनची का गरज आहे हे लक्षात घ्या. लोकेशन संबंधित परवानगी देताना तुम्ही अ‍ॅपला कायमस्वरूपी लोकेशन अ‍ॅक्सेस देऊ शकता किंवा जेव्हा ते अ‍ॅप वापरता तेवढ्या वेळेसाठी अ‍ॅक्सेस देऊ शकता. प्रायव्हसीसाठी अ‍ॅप लोकेशन परमिशन डिसेबल देखील करता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here