4,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च होईल हुआवई वाय7 (2019)

टेक कंपनी हुआवई अंर्तराष्ट्रीय मंचावर आपली वाय सीरीज वाढवण्याची तयारी करत आहे. कपंनीचा या सीरीजचा आगामी स्मार्टफोन वाय7 (2019) असेल, जो येत्या महिन्यांत बाजरात येईल. हुआवई कडून वाय7 (2019) बदल घोषणा होण्याआधीच एका एक लीक मध्ये या फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हुआवई वाय7 (2019) फक्त लुक आणि डिजाईन मुळे शानदार नाही तर कमी किंमतीची पण यूजर्सना चांगले स्पेसिफिकेशन्स पण देईल.

हुआवई वाय7 (2019) संबंधित हा लीक प्रसिद्ध टिप्सटर रोनाल्ड क्वांड ने शेयर केला आहे. या लीक मध्ये वाय7 (2019) च्या फोटो सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सची माहित दिली आहे. हुआवईचा हा आगामी स्मार्टफोन ‘यू’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. फ्रंट पॅनल वर ​तिन्ही किनारे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूस थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला ज्यावर हुआवई लिहिलेले आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे.

वाय7 (2019) चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा फोन 19.5:5 आस्पेक्ट रेशियो सह 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर सादर केला जाईल. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल जो 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालेले. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल.

लीकनुसार हुआवई वाय7 (2019) चा एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी मिळेल. बोलले जात आहे कि फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट काही बाजारांत हुआवई वाय7 प्राइम किंवा प्रो नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

हुआवई वाय7 (2019) च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा मिळू शकतो. लीक नुसार वाय7 (2019) हुआवई 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च करू शकते. लीक नुसार हुआवई वाय7 (2019) चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट सर्वात आधी युरोपात लॉन्च केला जाईल याची किंमत 150 यूरो म्हणजे जवळपास 12,000 रुपये असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here