631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची भारतीय बाजारात एंट्री

भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये हुंडईनं आपली नवीन इलेक्ट्रिक कार Hyundai IONIQ 5 631km रेंजसह लाँच केली आहे, हा इव्हेंट Auto Expo 2023 मध्ये पार पडला. कंपनीनं या मोठ्या इव्हेंट दरम्यान ई-कारच्या किंमतीचा खुलासा केला आहे. परंतु भारतात या ई-कारची बुकिंग लाँचपूर्वीच सुरु झाली आहे. ग्राहक 1 लाख रुपये देऊन कंपनीची ही नवीन ईव्ही बुक करू शकतात. चला जाणून घेऊया या कारची किंमत तसेच फीचर्सही.

Hyundai Ioniq 5 ची किंमत

Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक कार Auto Expo 2023 मध्ये बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खाननं लाँच केली आहे. ही कार भारतात सादर करण्यासोबतच कंपनीनं हिच्या किंमतीचा खुलासा देखील केला आहे. Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक एक्स्यूवी कारची किंमत 44.95 लाख ठेवण्यात आली आहे. परंतु ही किंमत पहिल्या 500 ग्राहकांसाठी असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. हे देखील वाचा: De Dhakka 2 OTT Release: मनोरंजनाचा आणखी एक धक्का; दे धक्का 2 ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर

हाय-लेव्हल मिळतील फीचर्स >

Hyundai IONIQ 5 बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं ही कार E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म) वर बनवली आहे आणि हा पहिला मॉडेल पंप-टू-प्लग रिवोल्यूशन सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. खास फीचर्स पाहता Hyundai IONIQ 5 मध्ये 21 Hyundai SmartSense (लेव्हल 2 ADAS) देण्यात आले आहेत.

Hyundai Ioniq 5 मध्ये ‘पॅरामेट्रिक पिक्सेल’ एलईडी हेडलॅम्प, इंटीग्रेटेड स्किड प्लेट्स सह फ्रंट आणि रियर बंपर, अ‍ॅक्टिव्ह एयर फ्लॅप्स (AAF), 20-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, फ्लश-फिटिंग डोर हँडल, एलईडी टेल लाइट्स, शार्क-फिन अँटीना, इंटीग्रेटेड स्पॉइलर आणि रेक्ड रियर विंडशील्ड देण्यात आली आहे.

Hyundai Ioniq 5 मध्ये दोन 12.3-इंचाच्या स्क्रीन (एक इंफोटेनमेंट सिस्टम आणि एक इंस्ट्रूमेंटसाठी यूनिट) आहे. तसेच यात आठ-स्पिकर म्यूजिक सिस्टम, ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, एक पावर्ड टेलगेट, हीटेड आणि हवेशीर फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस चार्जिंग देण्यात आली आहे.

डाइमेंशन पाहता, Hyundai Ioniq 5 ची लांबी 4,635mm, रुंदी 1,890mm आणि उंची 1,625mm आहे. मॉडेलचा व्हीलबेस 3,000mm आहे. मॉडेल तीन कलर ऑप्शन- मॅट ग्रेविटी गोल्ड, ऑप्टिक व्हाइट आणि मिडनाइट ब्लॅक पर्लमध्ये विकत घेता येईल. तसेच Hyundai Ioniq 5 मध्ये सुरक्षेसाठी सहा एयरबॅग, EBD सह ABS, VESS, EPB, MCB आणि चार डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: ओप्पो-विवो नव्हे तर शाओमीचा सेल्फी एक्सपर्ट होणार लाँच; Xiaomi 13 Lite वेबसाइटवर लिस्ट

18 मिनिटांत 80 टक्के चार्ज

Hyundai Ioniq 5 मध्ये 72.6kWh चा बॅटरी पॅक आहे जो 214bhp चा पावर आउटपुट आणि 350Nm टार्क निर्माण करतो. रिपोर्ट्सनुसार ही कार एकदा चार्ज केल्यास 631 किमीची एआरएआय-सर्टिफाईड रेंज देते. तसेच ग्राहक कंपनीच्या 350kw डीसी चार्जरचा वापर करून फक्त 18 मिनिटांत ही कार 10-80 टक्के चार्ज करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here