अनेक दिवस चर्चेत रोहिल्यांनंतर चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO आता आपली बहुचर्चित OPPO Reno8 T सीरिज जागतिक बाजारात सादर करू शकते. या ओप्पो रेनो8 टी सीरिजमध्ये OPPO Reno 8T 4G आणि OPPO Reno 8T 5G या दोन स्मार्टफोन्सचा समावेश केला जाऊ शकतो. हे दोन्ही फोन जागतिक बाजारात येत्या 8 फेब्रुवारीला सादर केले जाऊ शकतात, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. Oppo नं दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात OPPO Reno 8T 4G स्मार्टफोन फलिफिन्समध्ये सादर केला जाऊ शकतो, परंतु सोबत या फोनचा 5जी व्हेरिएंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
OPPO Reno 8T ची लाँच डेट
कंपनीनं शेयर केलेल्या प्रमोशनल पोस्टरमधून OPPO Reno 8T चा लूक अधिकृतपणे जगासमोर आला आहे. या पोस्टरनुसार हा फोन फिलिफिन्समध्ये 8 फेब्रुवारीला सादर केला जाऊ शकतो. OPPO Reno 8T 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, तसेच हा फोन ब्लॅक आणि ऑरेंज कलर ऑप्शनसह बाजारात येऊ शकतो. कंपनीनं दावा केला आहे की हा फोन एक ‘पोर्ट्रेट एक्सपर्ट’ आहे, त्यामुळे OPPO Reno 8T मध्ये चांगला कॅमेरा सेटअप अपेक्षित अपेक्षित आहे. हे देखील वाचा: Coca-Cola Phone! बाजारात होणार नव्या भिडुची एंट्री?
OPPO Reno 8T 4G चे लीक स्पेसिफिकेशन्स
- 6.43″ FHD+ AMOLED Display
- 8GB RAM + 128GB storage
- MediaTek Helio G99
- 32MP Selfie Camera
- 100MP OmniVision Camera
- 33W 5,000mAh battery
फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, लीक्स नुसार हा मोबाइल फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. फोन स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करू शकते. रेनो 8टी 4जी फोन पंच-होल स्टाईलसह येईल जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला देखील सपोर्ट करू शकतो. लीकनुसार हा फोन 600निट्स ब्राइटनेस आणि 409पीपीआय सारख्या फीचरसह येऊ शकतो.
OPPO Reno 8T 4G मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर चालू शकतो. लीकमध्ये फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट समोर आला आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी 33वॉट सुपरवूक चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हा ओप्पो फोन आयपी54 रेटिंगसह मार्केटमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा: मोटोरोलाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच; असे आहेत Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. लीकनुसार हा ओप्पो मोबाइल 100 मेगापिक्सल ओमनीव्हिजन रियर सेन्सरला सपोर्ट करू शकतो, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Reno 8T 4G मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.