कमी किंमतीत नवीन Infinix 5G फोन लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • Hot 30 रेंज मध्ये नवीन 5G डिवाइस सादर झाला आहे.
  • ह्यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • ह्याची विक्री 18 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल.

Infinix नं आपल्या Hot 30 रेंजमध्ये नवीन 5G डिवाइस भारतात लाँच केला आहे. एकीकडे मोठ्या कंपन्या 5G फोन्स महागड्या किंमतीत विकत आहेत, तर दुसरीकडे Infinix Hot 30 5G अत्यंत स्वस्तात आला आहे. ह्या फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन, किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती.

Infinix Hot 30 5G ची किंमत

कंपनीनं स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लाँच केला आहे. ज्यात 4GB रॅम +128GB ऑप्शनची किंमत 12,499 रुपये आहे. तर, 8GB रॅम + 128GB मॉडेल 13,499 रुपयांचा आहे. फोनची विक्री 18 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल. तसेच लाँच ऑफर पाहता युजर्सना फोनवर अ‍ॅक्सिस बँक कार्डच्या मदतीनं हजार रुपयांचा डिस्कॉउं मिळेल.

Infinix Hot 30 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनचा डिस्प्ले पाहता ह्यात युजर्सना 6.78 इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात डायनॅमिक 120hz रिफ्रेश रेट, 580निट्स ब्राइटनेस मिळते. डिस्प्लेवर पंच होल डिजाइन देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : चांगल्या परफॉर्मन्स आणि 5G साठी डायमेन्सिटी 6020 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 8GB रॅम +128GB इंटरनल स्टोरेज मिळते. रॅम वाढवण्यासाठी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं 16GB पर्यंत रॅम वाढवता येईल.
  • कॅमेरा : स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि AI लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलची कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : स्मार्टफोन दीर्घकाळ चालणाऱ्या 6000mAh बॅटरीसह येतो. ह्यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • अन्य : Infinix Hot 30 5G चे अन्य फीचर्स पाहता ह्यात ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम सपोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एनएफसी सारखे अनेक बेसिक फीचर देण्यात आले आहेत. तसेच हा फोन 14 5जी बँडला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here