6,000mAh बॅटरी आणि 6.82-इंच डिस्प्ले सह लॉन्च झाला हा स्मार्टफोन, Xiaomi-Realme देईल टक्कर

Transsion Holdings च्या मालकीची कंपनी Infinix गेले काही दिवस भारतात आले किफायतशीर आणि बजेट स्मार्टफोन्स सादर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीच्या या फोन्सची किंमत 10,000 रुपयांच्या आत होती. तसेच पुन्हा एकदा कंपनीने भारतीय बाजारात कमी किंमतीत दमदार फोन सादर करून रियलमी आणि शाओमी सारख्या कंपन्यांसमोर आव्हान उभे केले आहे. कंपनीने 6000mAh बॅटरी आणि मोठ्या 6.82 इंचाच्या स्क्रीन सह Infinix Smart 4 Plus लॉन्च केला आहे. हँडसेट मिडनाइट ब्लॅक, ओशल वेव आणि वॉयलट कलर मध्ये सादर केला गेला आहे.

स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.82 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20.5:9 आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए25 प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसर सह कंपनीने फोन फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 3 रॅम जीबी व इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे. या फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेगमेंट पाहता इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर सह 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी एफ/2.0 अपर्चर सह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक, 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो-यूएसबी सारखे फीचर्स आहेत. तसेच स्मार्टफोनला पावर देण्यासाठी 6000mAh बॅटरी आहे जी 10वाट चार्जिंग सह येते. तसेच स्मार्टफोन एंडरॉयड 10 बेस्ड XOS 6.2 वर चालतो.

किंमत आणि उपलब्धता

Infinix Smart 4 Plus कंपनीने 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट वर 28 जुलै पासून सुरु होईल. तसेच कंपनीने फोन सोबत अनेक ऑफर्स पण दिल्या आहेत. ऑफर्स नुसार फ्लिपकार्ट वर ऍक्सिस बॅंक कार्ड सह 5 टक्के आणि ऍक्सिस बॅंक बझ क्रेडिट कार्ड सह 5 टक्के सूट मिळेल. तसेच फोन 889 रुपये प्रति माह नो-कॉस्ट ईएमाई वर विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here