DSLR सारख्या कॅमेऱ्यासह यावर्षी लॉन्च होईल iPhone 13, समोर आली महत्वाची माहिती

गेल्या वर्षी ऍप्पलने सादर केलेल्या iPhone 12 सीरीजचे स्मार्टफोन्स जगभरात चमक दाखवत आहेत आणि त्यामुळे कंपनी नवीन रेकॉर्ड बनवत आहे. तर दुसरीकडे दरवर्षी प्रमाणेच Apple यावर्षी आपले नवीन आणि ऍडव्हान्स iPhone लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यावर्षी ऍप्पलद्वारे सादर केल्या जाणाऱ्या iPhone 13 Series च्या स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सबाबत आतापासून चर्चा सुरु होऊ लागली आहे. बातमी येत आहे कि आयफोन 13 सीरीजच्या मोबाईल्स मध्ये काही मोठे बदल दिसू शकतात. सध्या iPhone 13 संबंधित जास्त माहिती समोर आली नाही, पण काही लीक्सनुसार हा फोन सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि आयफोन 13 सीरीजच्या फोन्सचा कॅमेरा डीएसएलआर कॅमेऱ्याप्रमाणे असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि iPhone 13 सीरीजसाठी कंपनीने Cupertino च्या एका टेक एक्सपर्टशी हात मिळवणी केली आहे आणि त्याच्याकडे आयफोन 13 साठी कॅमेरा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : कमी किंमतीत येत आहे नवीन iPhone!, येईल अनेक नवीन फीचर्ससह

बोलले जात आहे कि यात सेंसर-शिफ्ट आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारखे फीचर्स असतील. तसेच कंपनीची योजना आहे कि आयफोन 13 सीरीज मध्ये डायरेक्ट टाइम-ऑफ-फ्लाइट (D-ToF) टेक्नॉलॉजी पण दिली जाईल. हे सेंसर US-आधारित कंपनीद्वारे दिले जातील.

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo ने माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, ज्यांची डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खूप खास असतील.

हे देखील वाचा : Apple iPhone 12 ची खरी किंमत फक्त 30,300 रुपये! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार नवीन आयफोन्स मध्ये OLED पॅनलचा वापर केला जाईल. फोन्सच्या टॉप दोन मॉडेल मध्ये LTOP OLED चा वापर केला जाऊ शकतो जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सह येईल. या लाइनअपच्या iPhone 13 Mini मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले, iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले, iPhone 13 Pro मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आणि iPhone 13 Pro मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असू शकतो.

फोल्डेबल आयफोन

सॅमसंग, मोटोरोला आणि हुवावे प्रमाणेच ऍप्पल पण आपल्या फोल्डेबल आयफोनची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी आयफोनसाठी फोल्डेबल आणि फ्लेक्सिबल स्क्रीनचा शोध घेत आहे. Bloomberg नुसार, सध्या कंपनीचा हा प्लान आपल्या सुरवातीच्या टप्प्यात आहे आणि हा 2021 मध्ये येणाऱ्या आयफोनसाठी नसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here