कमी किंमतीत येत आहे नवीन iPhone!, येईल अनेक नवीन फीचर्ससह

प्रीमियम फोन बनवणाऱ्या टेक कंपनी ऍप्पलने गेल्या वर्षी कमी किंमतीत iPhone SE 2020 लॉन्च करून सर्वांना धक्का दिला होता. कमी किंमतीत ऍप्पलचा फोन मिळणे लाखो ऍप्पल फॅन्ससाठी त्यांचे स्वप्न सत्यात येण्यासारखे होते. हा डिवाइस आल्यानंतर काही दिवसानंतर अशी चर्चा सुरु झाली होती कि कंपनी अजून एका आयफोन एसई मॉडेल वर काम करत आहे जो iPhone SE Plus नावाने ओळखला जाईल. तसेच, आता या आयफोनचे डिटेल्स समोर आले आहेत.

@Aaple_lab नावाच्या एका टिपस्टरने iPhone SE प्लसच्या मुख्य फीचर्स आणि किंमतीबाबत माहिती दिली आहे. फोनची किंमत जवळपास 499 डॉलर (जवळपास 36,300 रुपये) असल्याची आशा आहे, जो आयफोन एसई (2020) च्या लॉन्च किंमतीपेक्षा $100 जास्त आहे. एका रेंडर लीक मध्ये असे समोर आले होते कि डिस्प्लेच्या वर एक वाइड नॉच आणि सिंगल रियर कॅमेरा मिळेल. टिपस्टरचा दावा आहे कि फोन ब्लॅक, रेड आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये लॉन्च होऊ शकतो.

स्पेसिफिकेशन्स

iPhone SE प्लस मध्ये 6.1-इंच IPS डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच यात Apple A13 बायोनिक किंवा Apple A14 बायोनिक चिप दिली जाऊ शकते. फोनचा रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलच्या iSight सेंसर सह येऊ शकतो.

सेल्फी कॅमेरा म्हणून फोन मध्ये 7-मेगापिक्सल रिजोल्यूशन सह सेंसर दिला जाऊ शकतो. कॅमेरा फीचर्स मध्ये सहा पोर्ट्रेट लाइट इफेक्ट्स, OIS आणि स्मार्ट HDR 3 चा समावेश असेल. सोबतच फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी डिवाइस IP67 रेटिंग सह येईल.

iPhone SE 3

काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि कंपनी अपकमिंग स्मार्टफोन iPhone SE 3 वर काम करत आहे, फेमस ऍप्पल अनॅलिस्ट Ming-Chi Kuo ने याबाबत दावा केला आहे कि कंपनी हा मॉडेल पुढल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीपर्यंत सादर करणार नाही. तसेच, रिपोर्ट मध्ये अशी माहिती देण्यात आली आहे कि iPhone 12 सीरीज प्रमाणेच पुढल्या वर्षी पण iPhone 13 सीरीज मध्ये चार मॉडेल्स सादर केले जातील.

iPhone SE 3 चे स्पेसिफिकेशन

रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि आयफोन एसई 3 स्मार्टफोन मध्ये 6.06-इंचाचा मोठा डिस्प्ले असू शकतो. फोन 5जी नेटवर्क सपोर्ट सह येईल. इतकेच नव्हे तर या फोन मध्ये ड्यूल रियर कॅमेरा आणि टच आयडी फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिला जाऊ शकतो. टच आयडीच्या प्लेसमेंट बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here