Motorola G82 5G च्या एमआरपीवर 4,000 रुपयांची सूट

भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये 5G सुरु झालं आहे, त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या हातात 5G डिवाइस हवा आहे. बाजारात मिड रेंज सेगमेंटमध्ये अनेक डिवाइस आहेत जे 5G ला सपोर्ट करतात परंतु जर तुम्हाला चांगला डिस्प्ले आणि कॅमेरा देखील हवा असेल तर तुम्ही Motorola G82 5G फोन विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या फोनवर सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart थेट 4,000 रुपयांचा सीधा डिस्काउंट देत आहे. फक्त डिस्काउंटच नव्हे तर कंपनी यावर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑप्शन देखील प्रोवाइड करत आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनला फ्लिपकार्टवर चांगली रेटिंग देखील मिळाली आहे. पुढे आम्ही Motorola G82 5G फोनची किंमत आणि फीचर्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Motorola G82 5G Price

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा 23,999 रुपयांच्या एमआरपीसह लिस्ट करण्यात आला आहे. परंतु सध्या कंपनी 4,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. म्हणजे तुम्हाला Motorola G82 5G फोन फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्यामुळे महागड्या 5G डिवाइसेसच्या गर्दीत मोटोरोलाचा हा दमदार हँडसेट खूप कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. बँक ऑफर पाहता हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 17,500 रुपयांपर्यंतची बचत देखील तुम्ही करू शकता. तसेच तुम्ही हा फोन 3 ते 24 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर देखील हा हँडसेट विकत घेऊ शकता. हे देखील वाचा: सर्वांच्या हातात असेल हा 5G फोन! फक्त 9,999 रुपयांमध्ये 50MP Camera आणि 7GB RAM सह लाँच

Motorola G82 5G specifications

स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुल HD+ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजॉल्यूशन मिळते. फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619L GPU आहे. स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: 599 रुपयांमध्ये वर्षभर चालणारा Amazon Prime Video Plan; Netflix आणि Disney+ Hotstar च्या अडचणी वाढल्या

मोटोरोला G82 5G डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात OIS ला सपोर्ट असलेला 50MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8MP ची अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. बॅटरी बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here