Samsung Galaxy S20 FE वर 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट; जाणून घ्या माहिती

नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असलेल्या लोकांसाठी सॅमसंगनं शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे कमी किंमतीत चांगला फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेता येईल. ही ऑफर सॅमसंगच्या हा फोन अफोर्डेबल प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S20 FE वर उपलब्ध आहे, ज्यात फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स मिळतात. हा फोन Snapdragon 865 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट, Super AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा, फास्ट चार्ज, वायरलेस चार्जिंग आणि 5G कनेक्टव्हिटीला सपोर्ट करतो. पुढे आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोनवरील ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy S20 FE 5G वरील ऑफर

Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोनची किंमत सध्या 40,999 रुपये आहेत. परंतु या फोनवर 5000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच या फोनवर 3000 रुपयांची सॅमसंग अपग्रेड डील मिळत आहे. या दोन्ही ऑफरमुळे सॅमसंगचा हा फोन फक्त 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगच्या अफोर्डेबल फ्लॅगशिप स्मार्टफोनवरील ही डील ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तसेच आजपासून सुरु झालेली ही ऑफर 19 नोव्हेंबर पर्यंत वैध असेल. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

Samsung Galaxy S20 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S20 FE मध्ये इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले आणि बेजल लेस डिजाईन मिळते. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी 3.34mm चा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटवर चालतो.

Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस आधारित सॅमसंग वनयूआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.73 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7 नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला सॅमसंगचा पावरफुल Snapdragon 865 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. ही फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: ताशी 200 चा टॉप स्पीड आणि 300km रेंजसह आली ही इलेक्ट्रिक बाइक, सर्वच फीचर्स थक्क करणारे

Samsung Galaxy S20 Fan Edition आयपी68 रेटेड आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफई मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here