iQOO 12 चा नवीन Anniversary Edition भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि सेलची तारिख

आयक्यूने डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपला सर्वात दमदार स्मार्टफोन iQOO 12 लाँच केला होता. तसेच, आता ब्रँडने iQOO 12 Desert Red Anniversary Edition ला भारतीय टेक मंचावर आणले आहे. तसेच हा स्मार्टफोन विशेषत:कंपनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सादर करण्यात आला आहे. ज्यात युजर्सना बॅक पॅनलवर रेड लेदर फिनिश दिला जाईल. चला, पुढे मोबाईलच्या सेलची तारिख आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.

iQOO 12 Anniversary Edition ची किंमत आणि उपलब्धता

  • आयक्यू 12 डेजर्ट रेड एनिवर्सरी एडिशन भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये विकला जाईल.
  • डिव्हाईसच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेजची किंमत 52,999 रुपये आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेज ऑप्शन 57,999 रुपयांमध्ये मिळेल.
  • आयक्यू 12 डेजर्ट रेड एनिवर्सरी एडिशन येत्या 9 एप्रिलपासून ई- कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉन आणि ब्रँडच्या वेबसाईटवर सेल होईल.
  • लाँच ऑफर अंतर्गत एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक कार्डवर 3,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट दिला जाईल. तर मासिक हप्ते आणि फोन घेणाऱ्यांसाठी आणि 9 महिन्यापर्यंत नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन मिळेल.
  • तसेच नवीन एडिशन व्यतिरिक्त लीजेंड आणि अल्फा सारखे दोन कलर ऑप्शन पहीला सेलसाठी उपलब्ध आहेत.

iQOO 12 Anniversary Edition चे स्पेसिफिकेशन

या नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला आधीच्या iQOO 12 सारखे स्पेसिफिकेशन पाहायला मिळतील. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

  • डिस्प्ले: iQOO 12 Anniversary Edition मध्ये तुम्हाला 6.78-इंचाचा 1.5K LTPO अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. यावर 2800 × 1260 पिक्सल रिजॉल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो, HDR10+, 144Hz वेरिएबल रिफ्रेश रेट, 3000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 2160Hz PWM डिमिंगला सपोर्ट दिला जाईल.
  • प्रोसेसर: हा डिव्हाईस पण क्वॉलकॉमच्या आतापर्यंतच्या सर्वात फास्ट स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट आहे. यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो GPU लावला जाणार आहे. हेच नाही गेमिंग आणि मोठ्या ऑपरेशनसाठी Q1 चिप पण लावली जाणार आहे.
  • स्टोरेज: मेमरीवा सेव्ह करण्यासाठी डिव्हाईस 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह ठेवला जाईल.
  • कॅमेरा: मोबाईलमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. ज्यात OIS ला सपोर्ट असलेला 50MP चा ऑम्निव्हिजन OV50H प्रायमरी सेन्सर, 50MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल सॅमसंग JN1 सेन्सर आणि OIS सह 64MP 3x टेलीफोटो कॅमेरा 100x पर्यंत डिजिटल झूमसह दिला जाईल. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा असेल.
  • बॅटरी: हा फोन 5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह ठेवला जाईल. याला लवकर चार्ज करण्यासाठी 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
  • ओएस: iQOO 12 Anniversary Edition मध्ये अँड्रॉइड 14 आधारित ओरिजिनओएस 4.0 काला सपोर्ट असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here