लॉन्चच्या आधीच समोर आली iQOO 3 च्या 4G आणि 5G मॉडेलची किंमत

iQOO सांगितले आहे कि कंपनी येत्या 25 फेब्रुवारीला भारतात स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव iQOO 3 असले जो 4G आणि 5G दोन मॉडेल्स मध्ये बाजारात एंट्री घेईल. शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर iQOO 3 चे प्रोडक्ट पेज पण बनवण्यात आले आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. तसेच आता बाजारात येण्याआधीच 91मोबाईल्सला iQOO 3 स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती पण मिळाली आहे. हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत इंडियन मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

91मोबाईल्सला सूत्रांकडून iQOO 3 च्या किंमतीची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार iQOO 3 चा 4G मॉडेल 35,000 रुपयांच्या आसपास बाजारात येईल. तसेच फोनच्या 5G मॉडेलची बेस किंमत इंडियन मार्केट मध्ये 40,000 रुपयांच्या आसपास असेल. फोनचा हाईएंड वेरिएंट बाजारात 45,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार iQOO 3 स्मार्टफोन फ्लिपकार्ट सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

iQOO 3

लीक रिपोर्ट्सनुसार हा डिवाईस 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार iQOO 3 मध्ये 20:9 चा आस्पेक्ट रेशियो मिळेल आणि या फोनचा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल.टेना वर V1955A म्हणजे iQOO 3 चे डायमेंशन 158.51 x 74.88 x 9.16एमएम आणि वजन 214.5 ग्राम असेल.

आईक्यू 3 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे जो 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. लीकनुसार iQOO 3 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 12 जीबी रॅम, 8 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम मिळेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन बाजारात 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज वर सेल साठी उपलब्ध होऊ शकतो. iQOO 3 एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,410एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या सोबत फोन मध्ये 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

लीक झालेल्या आईक्यू 3 च्या फोटो वरून समजले होते कि हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. बोलले जात आहे कि या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जो Sony IMX686 किंवा Samsung GW1 सेंसर असेल. तसेच iQOO 3 मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या दोन इतर कॅमेरा सेंसर्सची माहिती पण समोर आली आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. iQOO च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि liquid कूलिंग टेक्नोलॉजी दिली जाईल ज्याची माहिती कंपनीने टीजर मध्ये पण दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here