Samsung Galaxy A14 4G फोन मलेशियात लाँच; किंमत मात्र समजली नाही

Highlights

  • Samsung Galaxy A14 4G मलेशियामध्ये ऑफिशियल झाला आहे.
  • हा लो बजेट स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 12 हजारांच्या आसपासत असू शकते.
  • गॅलेक्सी ए14 4जी फोनला RAM Plus फीचरसह 12GB RAM ची पावर मिळते.

Samsung Galaxy A14 4G: गेली कित्येक दिवस लीक्स आणि टेक मार्केटच्या चर्चेत राहिल्यानंतर आज अखेरीस हा स्वस्त सॅमसंग स्मार्टफोन समोर आला आहे. कंपनीनं मलेशियामध्ये गॅलेक्सी ए14 4जी फोन मलेशियात ऑफिशियल केला आहे. सॅमसंगनं आपला हा लो बजेट मोबाइल फोन वेबसाइटवर लाइव्ह केला आहे जिथे फोटो, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची सर्व माहिती देण्यात आली आहे, परंतु किंमत सांगितली नाही.

Samsung Galaxy A14 4G

  • 6.6″ FHD+ Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 6GB RAM Plus
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 2.0GHz octa-core processor
  • 15W 5,000Mah Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 201 ग्राम आहे. मलेशियन वेबसाइटवर हा फोन सध्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह समोर आला आहे. हे देखील वाचा: बर्फासारखा थंड राहणारा फोन! पण तुम्हाला खरेदी करता येणार नाही OnePlus चा हा हटके स्मार्टफोन

Samsung Galaxy A14 4G फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर लाँच झाला आहे ज्यात 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीनं चिपसेटचं नाव सांगितलं नाही परंतु हा मोबाइल मीडियाटेक हीलियो जी80 सह विकला जाईल, अशी चर्चा आहे. गॅलेक्सी ए14 रॅम प्लस फीचरनं सुसज्जित आहे त्यामुळे फोनचा इंटरनल 6जीबी रॅम वाढवून 12जीबी करता येतो.

फोटोग्राफीसाठी हा सॅमसंग फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: मार्च एंडिंग असलं तरी फुल टू करमणूक करतील ‘हे’ चित्रपट; पुढील महिन्यात येणार OTT वर

Samsung Galaxy A14 4G फोनमध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचची मोठी बॅटरीला सपोर्ट करतो जी 15वॉट फास्ट चार्जिंगसह येते. तसेच सिक्योरिटीसाठी याच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. हा सॅमसंग फोन Black, Silver, Green आणि Dark Red कलरमध्ये सादर करण्यात आहे ज्याची किंमत मात्र कंपनीनं अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here