16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे.
  • हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC देण्यात आली आहे.
  • फोनची प्रारंभिक किंमत 34,999 रुपये आहे

iQOO Neo 7 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Neo-series मध्ये आलेला हा फोन भारतातील iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्या स्मार्टफोनची जाडी फक्त 8.5एमएम आहे तर वजन 197ग्राम आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन आयकू स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

iQOO Neo 7 Pro ची किंमत

  • iQOO Neo 7 Pro च्या 8GB/128GB मॉडेलची किंमत 34,999 रुपये आणि 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.
  • हा फोन 18 जुलै पर्यंत 1,000 रुपयांची डिस्काउंटसह विकत घेता येईल.
  • एसबीआय आणि आयसीआयसीआय डेबिट/क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
  • iQOO च्या प्रामाणिक ग्राहकांसाठी 6 महिने नो-कॉस्ट ईएमआय, 2,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. तसेच 2 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळत आहे.

iQOO Neo 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : आयकू नियो 7 प्रो 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल वापरून बनवण्यात आली आहे जी पंच-होल स्टाईलवर बनली आहे. हा आयकू मोबाइल 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच ह्यात एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळतात.
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज : प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.
  • ओएस : iQOO Neo 7 Pro अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएससह चालतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 रेसिंग एडिशन च्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा फोन 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here