
itel कंपनीनं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत स्वस्त स्मार्टफोन itel A60s सादर केला आहे. फोनची विक्री अॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान 12 जुलैपासून सुरु होईल. डिवाइसमध्ये 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, 5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेरा सेटअपसह अनेक शानदार फीचर्स दिले जात आहेत. पुढे तुम्ही ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत वाचू शकता.
Itel A60s किंमत आणि उपलब्धता
कंपनीनं Itel A60s 4GB रॅम + 128GB स्टोरेजसह 6,999 रुपयांमध्ये आणण्याची घोषणा केली आहे. तर ह्याचा 4GB रॅम + 64GB स्टोरेज ऑप्शन 6,299 रुपयांमध्ये मिळेल. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर आगामी 12 जुलैपासून सुरु होईल. तसेच कलर ऑप्शन पाहता डिवाइस शॅडो ब्लॅक, मून लाइट वॉयलेट आणि ग्लेशियर ग्रीन सारख्या तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच होईल.
Itel A60s चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले : Itel A60s स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन मिळते. ह्यात देखील सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
- प्रोसेसर : फोनच्या प्रोसेसरची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
- स्टोरेज : डिवाइसमध्ये 4GB रॅम +128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच ह्यात 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील आहे.
- बॅटरी : हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंगला सपोर्ट करतो.
- कॅमेरा : Itel A60s मध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि OVGA लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.
- OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा डिवाइस अँड्रॉइड 12 वर चालतो.















