822Km रेंज सह लाँच झाली नवीन लग्जरी इलेक्ट्रिक कार, 20 स्पीकरसह मिळत आहेत दमदार फीचर्स

इलेक्ट्रिक व्हीकल (EV) कंपनी Zeekr नं चीनी मार्केट मध्ये आपली आतापर्यंतची सर्वात लग्जरी इलेक्ट्रिक MPV (Electric Car) लाँच केली आहे. कंपनीनं सादर केलेली इलेक्ट्रिक कार Zeekr 009 नावानं बाजारात आली आहे. कंपनीनं ही कार 009 त्याच प्लॅटफॉर्मवर सादर केली आहे, ज्यावर कंपनीनं आपली पहिली बॅटरी असलेली कार 001 सादर केली होती. ही ऑल-व्हील-ड्राइव मिनीवॅन 536 हॉर्सपावर आणि 505 पाउंड-फीट टॉर्क देते. आइए चला जाणून घेऊया या कारची आणखी वैशिष्ट्ये, फीचर्स आणि रेंजची संपूर्ण माहिती.

इलेक्ट्रिक कारचा आकार

कंपनीनं ही मोठी लग्जरी MPV 009 मिनीवॅनची लांबी 5,209mm आणि रुंदी 2,024mm ठेवली आहे. तर हीच व्हीलबेस 3,205mm आहे. तसेच गाडीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत 2+2 कॅप्टन सीट्स आहेत. या MPV चं वजन 2,830 किलोग्राम आहे. हे देखील वाचा: Electric Vehicle Fire: पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक लागली आग! बॉडी विरघळली, पाहा व्हिडीओ

मिळेल 822Km ची रेंज

मोठी रेंज देण्यासाठी कंपनीनं यात डुअल मोटर दिली आहे जी 536bhp ची पावर आणि 686Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात 116kWh बॅटरी पॅक असलेल्या बेस मॉडेलमध्ये 702km पर्यंतची रेंज मिळते. तर 140kWh बॅटरी पॅक वापरून ही कार सिंगल चार्जमध्ये 822Km पर्यंतचा प्रवास करू शकते.

या कारमध्ये कंपनीनं शानदार इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. यात मिळणाऱ्या इन्फोटेनमेंट स्क्रीनचा आकार 10.4-इंच आहे. हिच्या सीलिंगवर 15.6-इंचाची टचस्क्रीन लावण्यात आली आहे जी कॉन्फ्रेंस कॉलिंग दरम्यान वापरता येते. तसेच यात 20-स्पीकर असलेली Yamaha surround sound system देखील आहे. इतकेच नव्हे तर कारमध्ये सात 8MP HD कॅमेरा, चार 2MP 360-डिग्री कॅमेरे आहेत. ज्यामुळे ही कार सुपर लग्जरी इलेक्ट्रिक कार बनते.

प्राइस आणि सेल डिटेल

कंपनीनं Zeekr 009 च्या किंमत आणि सेलची माहिती मात्र दिली नाही. परंतु लवकरच या दोन्ही गोष्टी समोर येतील अशी आशा आहे. तसेच इंडियन मार्केटमध्ये ही कार कधी येईल याबाबत देखील खात्रीलायक माहिती मिळाली नाही. हे देखील वाचा: फक्त 90 हजार देऊन घरी आणा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; Tata Tiago EV देते सिंगल चार्जवर 315km ची रेंज

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here