7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल लाँच itel A60S, ह्यात असेल 8GB पर्यंत रॅमची पावर

Highlights

  • अ‍ॅमेझॉनवर itel A60S चा टीजर समोर आला आहे.
  • फोन काही दिवसांपूर्वी लाँच होण्याची शक्यता आहे.
  • ह्यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिसत आहे.

कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन देणारी Itel कंपनी भारतीय युजर्ससाठी आणखी एक नवीन स्वस्त itel A60S डिवाइस लेकर घेऊन येत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर फोन लाँचचा टीजर समोर आला आहे. खास बाब म्हणजे मोबाइलमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 8GB पर्यंत रॅम पर्यंत पावर मिळेल. ते देखील फक्त 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत. चला जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन आणि लाँच संबंधित माहिती.

itel A60S कधी होईल लाँच

ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर itel A60S चा टीजर समोर आला आहे. ज्यात फोनच्या खास स्पेसिफिकेशन आणि प्रसिद्ध अभिनेता रितिक रोशन फोनसह दिसत आहे. टीजरमधून लाँच डेट समजली नाही परंतु लवकरच हा फोन लाँच होणं अपेक्षित आहे. टीजर मध्ये कंपनीनं दावा केला आहे की हा फोन 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होणार आहे.

itel A60S चे स्पेसिफिकेशन्स

  • डिजाइन : itel A60S मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिसत आहे. बॅक पॅनलवर शानदार डिजाइन आणि मोठा चौकोनी कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. ज्यात दोन कॅमेरा एक एलईडी फ्लॅश यूनिट आहे. तसेच ह्यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
  • स्टोरेज : अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमध्ये आयटेल ए60एस 4 जीबी रॅम आणि 4 जीबी व्हर्च्युअल रॅमसह येईल असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे युजर्सना 8GB पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल. डिवाइसमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.
  • डिस्प्ले : गेल्या आठवड्यात आयटेल A60S नायजेरियामध्ये लाँच झाला होता. ह्यात 6.6 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो 720 x 1600 पिक्सल रिजॉल्यूशन देतो.
  • प्रोसेसर : itel A60S मध्ये यूनिसोक SC9863A1 प्रोसेसर लगा आहे जो 1.6GHz क्लॉक स्पीड वर चालतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 5 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइस 5000 एमएएच बॅटरीसह येतो.
  • इतर फीचर्स : इतर फीचर्स पाहता डिवाइसमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम सारखे फीचर्स आहेत.

अ‍ॅमेझॉन लिस्टिंग आणि वरील फीचर्ससह भारतात देखील itel A60S दाखल होऊ शकतो. आता हा फोन ऑफिशियल होण्याची वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here