12GB RAM आणि MediaTek Helio G99 Ultimate प्रोसेसरसह आला itel RS4, जाणून घ्या स्पेसिफिकेशन

आयटेलने आज फिलिपिंसमध्ये आपला नवीन स्मार्टफोन itel RS4 लाँच केला आहे. स्टायलिश लूक आणि जबरदस्त स्पेशिकेशन असलेला हा फोन 12GB RAM आणि MediaTek Helio G99 Ultimate प्रोसेसरवर चालतो ज्यात 50MP Camera आणि 5,000mAh Battery ची पावर पण मिळते. आयटेल आरएस 4 ची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

itel RS4 चे स्पेसिफिकेशन

  • 6.56″ HD+ 120Hz Display
  • MediaTek Helio G99 Ultimate
  • 12GB RAM + 256GB Storage
  • Upto 12GB Virtual RAM
  • 50MP Dual Rear Camera
  • 8MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery
  • 45W Fast Charging

डिस्प्ले :
आयटेल आरएस 4 स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.56 इंच एचडी+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

मेमरी :
फिलिपिंसमध्ये हा आयटेल फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे ज्यामध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज तसेच 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. फोनच्या 8 जीबी रॅम व्हेरिएंट 8 जीबी वचुर्अल रॅम तसेच 12 जीबी रॅम मॉडेल 12 जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करते.

परफॉर्मन्स :
itel RS4 अँड्रॉईड 13 आधारित आयटेलओएस 13.5 वर सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 अल्टीमेट ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी यात माली-जी 57 जीपीयू आहे.

कॅमेरा :
हा आयटेल मोबाईल ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एआय लेन्ससह मिळून चालतो. सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी :
पावर बॅकअपसाठी itel RS4 मध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोन 45 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा फोन 35 दिवसांचा स्टॅन्डबाय टाईम देण्याची क्षमता ठेवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here