
91मोबाइल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की itel Super Guru नावानं फीचर फोन लाँच केले जाणार आहेत. तसेच आता कंपनीनं itel Super Guru सीरीज अंतगर्त तीन फीचर फोन सादर केले आहेत. सीरीजमध्ये Super Guru 200, Super Guru 400 आणि Super Guru 600 चा समावेश आहे. विशेष म्हणजे फोनसह 4 तासात कस्टमर सर्व्हिस आणि यूपीआय पेमेंटचा ऑफ्शन मिळेल. चला जाणून घेऊया फोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
तिन्ही फोनमधून होईल यूपीआय पेमेंट
itel Super Guru Series सह क्यूआर कोड स्कॅनर देण्यात आला आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकाल. यूपीआय 123पे NPCI द्वारे बनवण्यात आलेली इंस्टंट पेमेंट सिस्टम आहे जी खासकरून फीचर फोन्ससाठी डिजाइन करण्यात आली आहे. हे फीचर इंटरनेटविना यूपीआय पेमेंट करण्यास मदत करतं.
UPI 123PAY मध्ये चार पर्याय देण्यात आला आहेत, ज्यात IVR (interactive voice response) नंबर, फीचर फोन अॅप, मिस्ड-कॉल आधारित इंटरफेस तसेच proximity sound-based पेमेंटचा समावेश आहे.
- itel Super Guru 400: ह्याची किंमत 1,699 रुपये आहे. ह्यात 1200mAh ची बॅटरी आहे जी 14 दिवसांचा बॅकअप देऊ शकते. तसेच अल्ट्रा स्लिम मेटल बॉडी मिळते आणि ह्यात 2.4 इंचाचा डिस्प्ले आहे.
- itel Super Guru 200: कंपनीनं हा 1,499 रुपयांमध्ये सादर केला आहे. तसेच, ह्यात देखील 1200mAh ची बॅटरी आहे जो 21 दिवसांचा स्टॅन्डबाय देऊ शकतो. हा फोन देखील मेटल फिनिशसह येतो. त्याचबरोबर ह्यात 1.3MP चा कॅमेरा देण्यात आला आहे आणि 1.8 इंचाचा डिस्प्ले आहे.
- itel Super Guru 600: ह्याची किंमत 1,899 रुपये आहे. तसेच, ह्यात 2.8 इंचाचा डिस्प्ले आणि मेटल बॉडी मिळते. तसेच फोनमध्ये 1900mAh ची बॅटरी आहे जी 20 दिवसांचा स्टॅन्डबाय देते. ह्यात देखील 1.3MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
इतकेच नव्हे तर तिन्ही फोनसह कंपनीनं मोफत ट्रान्सपरंट कव्हर देणार आहे. तसेच जर फोनमध्ये काही प्रॉब्लम आला तर त्या तक्रारींचे निवारण 4 तासात केलं जाईल.














