दूरसंचार नियामक ट्राई ने यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या जाहीर केलेल्या ताजा आकड्यांनुसार सरासरी 4G डाउनलोड स्पीड मध्ये रिलायंस जियो ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. फेब्रुवारी मध्ये जियोने सरासरी डाउनलोड स्पीड 20.9 एमबीपीएएस नोंदवला, जो जानेवारी मधील 18.8 एमबीपीएस स्पीड पेक्षा जास्त आहे.
गेल्यावर्षी म्हणजे 2018 मध्ये सर्वात वेगवान 4 जी ऑपरेटरचे स्थान पण रिलायंस जियो कडे होते, जियोचा डाउनलोड स्पीड वर्षभरात सर्वांपेक्षा जास्त होता. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) द्वारा जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, भारती एयरटेलचा डाउनलोड स्पीड 9.5 एमबीपीएस वरून कमी होऊन फेब्रुवारीत 9.4 एमबीपीएस झाला आहे.
शाओमी आणत आहे भारतात सर्वात स्वस्त फोन, 4,000 पण असू शकते किंमत
वोडाफोन आणि आइडिया सेल्युलर एक झाल्या आहेत आणि आता वोडाफोन आइडिया म्हणून काम करत आहे. पण ट्राई ने दोन्ही नेटवर्कचा डाउनलोड, अपलोड स्पीड वेगवेगळा दाखवला आहे. वोडाफोन नेटवर्कचा सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड जानेवारीतील 6.7 एमबीपीएस वरून वाढत फेब्रुवारीत 6.8 एमबीपीएस झाला आहे.
आइडिया ने पण जानेवारीत 5.5 एमबीपीएस स्पीड मध्ये सुधार दाखवला आहे. फेब्रुवारीत त्यांचा सरासरी डाउनलोड स्पीड 5.7 एमबीपीएस झाला आहे. फेब्रुवारीत वोडाफोन ने 4जी अपलोड स्पीड मध्ये नंबर एकचे स्थान मिळवले आहे. पहिले स्थान कंपनीने आइडियाला मागे टाकून मिळवले आहे. जानेवारीत आइडिया अपलोड स्पीड मध्ये नंबर एक होती. वोडाफोनचा 4जी अपलोड स्पीड गेल्या महिन्याच्या 5.4 एमबीपीएस वरून वाढून फेब्रुवारीत 6.0 एमबीपीएस झाला आहे.
3 कॅमेरा आणि क्वॉलकॉमच्या नवीन प्रोसेसर सह लॉन्च झाले असूसचे दोन फोन, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
फेब्रुवारीत आइडिया आणि एयरटेल नेटवर्कच्या सरासरी 4जी अपलोड स्पीड मध्ये थोडी घसरण दिसली आहे. आइडियाचा 4जी अपलोड स्पीड 5.6 एमबीपीएस आणि एयरटेल चा 3.7 एमबीपीएस आहे. विशेष म्हणजे Jio चा सरासरी अपलोड स्पीड सुधारला आहे जो फेब्रुवारीत 4.5 एमबीपीएस आहे. ट्राई द्वारा सरासरी स्पीडची मोजणी केलेल्या आकड्यांच्या आधारे केली जाते जी रिअल टाईम आधारवर माईस्पीड ऍप्लिकेशनच्या मदतीने केली जाते.














