5G सर्व्हिससाठी घ्यावं लागणार का नवीन सिम? Jio च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

jio 5g works on 4g sim

Jio 5G Recharge Plan: 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G युगाची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी IMC 2022 मध्ये 5G सर्व्हिसला हिरवा कंदील दाखवला. एयरटेलनं तर भारतातील 8 शहरांमध्ये 5G सेवा सुरु देखील केली. परंतु भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी जियोच्या 5G सेवेसाठी आपल्याला अजून काही दिवस वाट पाहावी लागेल. आता एक रिपोर्टमध्ये समोर आले आहे की Jio 5G Service वापरण्यासाठी ग्राहकांना सिम बदलण्याची गरज पडणार नाही. याचा अर्थ असा की जियो युजर्स आपल्या 4G SIM वरच 5G Network चा वापर करू शकतील.

4G SIM वर चालेल 5G

जियोच्या एका एक एग्जिक्यूटिव्हनं ईटी टेलीकॉमला सांगितलं आहे की 5जी सर्व्हिस मिळवण्यासाठी तुमचं जियो सिम कार्ड बदलण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी हा एक ऑप्ट-इन पर्याय असेल आणि ग्राहक आपोआप 5G नेटवर्कवर अपग्रेड होतील. जियोच्या मते त्यांच्याकडे 5जी सेवेवर अपग्रेड करण्या योग्य टेक्नॉलॉजी आहे आणि ती सध्या उपलब्ध असलेल्या 4जी टॉवर्सना 5जीवर कन्व्हर्ट करेल.

jio 5g works on 4g sim

2023 पर्यंत संपूर्ण देशात मिळेल Jio 5G

मुकेश अंबानींनी विश्वास दर्शवला की लवकरच देश, 5जीच्या सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ शकेल. दिवाळीपर्यंत निवडक मेट्रो शहरांमध्ये आणि 2023 च्या अखेरीस देशातील प्रतयेक शहर आणि तालुक्यात 5 जी सर्व्हिस सुरु केली जाईल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेटमध्ये शानदार 2K डिस्प्ले; 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री

रिलायन्स जियोचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी संकेत दिला की जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात 5जी सेवा स्वस्त असेल. ते म्हणाले “5G रोलआउट भारताच्या दूरसंचार इतिहासातील असामान्य घटना असेल. भलेही भारताने ही सेवा सुरु करण्यासाठी सुरुवात उशिरा केली असेल, परंतु याची गुणवत्ता जगात उच्च दर्जाची असेल आणि जास्त किफायती 5G सेवा दिली येईल.”

jio 5g works on 4g sim

तीन वर्षांपासून तयारी सुरु

रिलायन्स इंडस्ट्रीच्या एजीएम 2022 मध्ये जियो 5G ची घोषणा करताना मुकेश अंबानींनी सांगितलं होतं की त्यांची कंपनी 5G साठी गेल्या पाच वर्षांपासून तयारी करत होती. कंपनीची सुमारे 3000 हजार इंजीनियर्सची यावर काम करत होती. मुकेश अंबानींनी सांगितलं की Jio 5G चा जगातील सर्वात मोठं आणि अ‍ॅडव्हान्स 5G नेटवर्क असेल. हे देखील वाचा: मनमोहक लूकसह Oppo च्या शानदार स्मार्टफोनची एंट्री; स्वस्तात 50MP Camera आणि 5000mAh Battery

1GB पेक्षा जास्त असेल स्पीड

काही दिवसांपूर्वी AGM 2022 दरम्यान जियो 5G च्या घोषणेच्या वेळी कंपनीनं आपल्या Jio True 5G ची स्पीड टेस्ट दाखवली, ज्यात स्मार्टफोनवर 1.09Gbps स्पीड दिसत होता. कंपनीनुसार जियो युजर्स 80 टक्के डेटा व्हिडीओ बघण्यासाठी खर्च करतात. त्यामुळे Jio True 5G मध्ये युजर्सना 4G पेक्षा शानदार व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि हाय क्वॉलिटी व्हिडीओ कॉलिंग एक्सपीरियंस मिळेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here