देशात सर्वात वेगाने पुढे जात असलेली टेक कंपनी रिलायंस जियो आपल्या ग्राहकांची काळजी घेत असते. दोन वर्षांपूर्वी भारतीय टेलीकॉम यूजर्स इंटरनेट डेटा आणि रोमिंग साठी महाग प्लान्स साठी पैसे देत होते. पण रिलायंस जियो ने आपली फ्री सर्विस देऊन देशातील मोबाईल बाजाराचा चेहरामोहरा बदलून टाकला. जियो खुप कमी किंमतीत चांगले फायदे देते. रिलायंस जियो येऊन दोन वर्षे होणार आहेत आणि हाच आनंद कंपनी आपल्या यूजर्स सोबत शेयर करत आहे. जियो आपल्या ग्राहकांना फ्री मध्ये 8जीबी इंटरनेट डेटा देत आहे.
रिलायंस जियो ने ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ सुरू केला आहे. हा पॅक यूजर्सना पूर्णपणे मोफत मिळत आहे. या पॅक अंतर्गत जियो ग्राहकांना एका दिवसात 2जीबी 4जी डेटा मिळेल. हा पॅक 4 दिवसांच्या वैधते सह येतो. म्हणजे 4 दिवसांत एकूण 8जीबी 4जी डेटा. जियो कडून हा 8जीबी डेटा अगदी मोफत मिळत आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या मर्जी नुसार करू शकता.
जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुम्हाला फ्री 8जीबी डेटा मिळाला आहे की नाही तर..
1. सर्वात आधी तुमच्या फोन मधील माय जियो अॅप ओपन करा
2. माय जियो अॅप मध्ये ‘माय प्लान्स’ ओपन करा
3. माय प्लान्स मध्ये सर्वात वर तुमचा करंट प्लान दिसेल आणि त्याखाली तुम्हाला तुमच्या इतर आॅफर्स सोबत ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ मिळेल.
4. जियो सेलिब्रेशन पॅक सोबत तुम्हाला या पॅकची एक्सपायरी डेट पण सांगण्यात येईल, म्हणजे हा फ्री इंटरनेट डेटा कधी पर्यंत मिळेल याची माहिती असेल.
पण जियो ने हा पॅक सर्व यूजर्सना एक साथ दिला नाही. वेगवेगळ्या सर्कल्सच्या यूजर्सना 8जीबी डेटा वाली आॅफर सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मिळेल. एक यूजर फक्त एकदाच जियो सेलिब्रेशन पॅक वापरू शकतो.
विशेष म्हणजे रिलायंस जियो ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ सोबत कॅडबरीच्या डेयरी मिल्क चॉकलेटच्या खरेदीवर पण 1जीबी इंटरनेट डेटा देत आहे. जियोची ही आॅफर फक्त 30 सप्टेंबर पर्यंत वैध आहे. या आॅफर अंतर्गत कमीत कमी 5 रुपयांचे कॅडबरी चॉकलेट विकत घेऊन त्याचा बारकोड जियो अॅप वर स्कॅन करावा लागेल आणि स्कॅन केल्यानंतर काही दिवसांनी यूजर्सना 1जीबी 4जी डेटा मिळेल. या आॅफरचा लाभ पण जियो यूजर एकदाच घेऊ शकतात.
जियो आॅफरच्या सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा