जियोनं लाँच केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन, वर्षभर डेटा आणि कॉलिंगचा लाभ

Highlights

  • जियोनं 123 आणि 1234 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे.
  • जियो भारत V2 फोन युजर्ससाठी रिचार्ज प्लॅन आले आहेत.
  • रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि डेटा मिळत आहे.

मुकेश अंबानी ह्यांची कंपनी रिलांयस जियोनं अलीकडेच ग्राहकांना धक्का देत आपला जियो भारत वी2 फोन लाँच केला आहे. ह्या 4G फोनसह कंपनीनं दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हा रिचार्ज प्लॅन 123 रुपये आणि 1234 रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहेत. तसेच प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. पुढे आम्ही तुम्हाला ह्या प्लॅनची संपूर्ण माहिती दिली आहे.

जियो 123 रुपयांचा प्लॅन

  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची वैधता दिली जात आहे.
  • तसेच रिचार्जमध्ये ग्राहकांना डेली 0.5 जीबी डेटा म्हणजे एकूण 14जीबी डेटा मिळेल.
  • तसेच हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगच्या सुविधेसह येतो.
  • इतर टेलीकॉम ऑपरेटर 179 रुपयांमध्ये व्हॉइस कॉलिंगसह 2 जीबी डेटा देत आहेत.

जियो 1234 रुपयांचा प्लॅन

  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 0.5 GB डेटा दिला जात आहे.
  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना 356 दिवसांची वैधता मिळेल.
  • हिशोब मांडल्यास प्लॅनमध्ये एकूण 128GB डेटा मिळतो.
  • त्याचबरोबर ह्या प्लॅनमध्ये फ्री व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळते.
  • हा एक अ‍ॅन्युअल प्लॅन आहे.
  • रिचार्ज बद्दल कंपनीनं दावा केला आहे की दोन्ही प्लॅन इतर प्लॅन्सच्या तुलनेत 30 टक्के स्वस्त आहेत. तसेच ह्या प्लॅनमध्ये 7 पट जास्त डेटा दिला जाता आहे.

Note : हे दोन्ही रिचार्ज प्लॅन जियोच्या अलीकडेच आलेल्या “जियो भारत वी2” फोनसाठी खास सादर करण्यात आले आहेत.

Jio Bharat V2 ची वैशिष्ट्ये

‘जियो भारत V2’ 4जी वर चालतो, ह्यात एचडी व्हॉइस कॉलिंग, एफएम रेडियो, 128 जीबीचा एसडी मेमरी कार्ड सपोर्ट असे फीचर आहेत. तसेच फोनमध्ये 4.5सेमी टीएफटी स्क्रीन, 0.3 मेगापिक्सलचा कॅमेरा, 1000 mAh ची बॅटरी, 3.5 mm हेडफोन जॅक, पावरफुल लाउडस्पिकर आणि टार्च आहे.

तसेच ‘जियो भारत V2’ मोबाइलच्या ग्राहकांना जियोसिनेमाच्या सब्सक्रिप्शनसह जियो-सावनच्या 8 कोटी गाण्यांचा अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे. हा मोबाइल 22 भारतीय भाषांमध्ये वापरता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here