Jio Offer: 300 रुपयांचा रिचार्ज करा आणि 10 लाख जिंका; जियोच्या भन्नाट ऑफरचे फक्त तीन दिवस शिल्लक

Reliance Jio Offer: नुकत्याच लाँच झालेल्या रिलायन्स लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीतून Jio 5G सह अनेक शानदार प्रोडक्ट्सची घोषणा करण्यात आली आहे. सध्या नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क सर्व्हिससाठी सज्ज असलेल्या Akash Mukesh Ambani यांच्या कंपनी रिलायन्स जियोनं भारतीय टेलीकॉम सेक्टरमध्ये 6 वर्ष पूर्ण केली आहेत. 6 व्या Jio Anniversary निमित्ताने कंपनीनं एक भन्नाट Offer सादर केली आहे. Jio Anniversary Offer ला कंपनीनं Reliance Jio 6 Days Of Recharge Dhamaka असं नाव दिलं आहे. या ऑफर अंतगर्त जियो युजर्स फक्त रिचार्ज करून लखपती बनू शकतात. चला जाणून घेऊया ही ऑफर ऑफर कशी आहे आणि क्षप्रकारे तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंतच बक्षीस जिंकू शकता.

Jio Anniversary Offer

जियोनं सादर केलेली ही अ‍ॅनिवर्सरी ऑफर 6 सप्टेंबर पासून 11 सप्टेंबर, 2022 पर्यंत वैध आहे. या ऑफर अंतगर्त जियोच्या प्लॅननं रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना रोज 10,00,000 रुपये किंवा 10 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल. हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात लाँच होऊ शकतो Realme C30s; 14 सप्टेंबरला रेडमीपेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो भारतात

अशाप्रकारे जिंका 10 लाख रुपये

या ऑफरच्या कालावधीत दौरान ग्राहकांना 299 रुपये किनवट त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रीपेड प्लॅननं रिचार्ज करावा लागेल, त्यानंतर ते 10 लाख रुपयांपर्यंतच गिफ्ट जिंकण्याची संधी मिळवू शकतात. कंपनीच्या साइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार जियोनं भारतातील सर्व युजर्ससाठी ही ऑफर सादर केली आहे. परंतु यात तामिळनाडु सर्कलमधील युजर्सना भाग घेता येणार नाही.

यंदा 5 सप्टेंबर 2022 रोजी जियोनं इंडस्ट्रीमध्ये सहा वर्ष पूर्ण केली. ही ऑफर लाइव्ह आहे, आणि रिचार्ज करणारे ग्राहक 10 लाख रुपये किंवा 10 लाख रुपयांचं बक्षीस जिंकू शकतात. याव्यतिरिक्त कोणीतही माहिती उपलब्ध नाही. रिलायन्स जियोनं सोशल मीडिया पोस्ट आणि कंपनीच्या साइटवर या ऑफरच्या टर्म्स अँड कंडीशनबद्दल जास्त माहिती दिली नाही.

JIO च्या 2,999 रुपयांचा प्लॅनमध्ये मिळतील 6 एक्सट्रा बेनिफिट्स

रिलायन्स जियोच्या अ‍ॅनिव्हर्सरी ऑफर अंतगर्त जियोच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी बेनिफिट्स तर मिळत आहेतच परंतु सोबत अन्य बेनिफिट्स देखील कंपनीनं जोडले आहेत. या प्लॅनमध्ये फ्री डेटा व्यतिरिक्त Ixigo, Netmeds, Ajio, Reliance Digital आणि Jio Savan साठी एक्स्ट्रा कुपन ऑफर केले जात आहे. हे देखील वाचा: iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

रिलायन्स जियोच्या 2,999 रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनीकडून रोज 2.5GB डेटा दिला जात आहे. परंतु या ऑफर अंतगर्त ग्राहकांना डेली डेटासह एकूण 75GB अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे. अशाप्रकारे युजर्सना या पॅकसह एकूण 912.5GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये रोज 100 SMS सह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल करता येतील. रिलायन्स जियो एक वर्षाचे Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन देखील मोफत देत आहे, ज्याची किंमत 499 रुपये आहे. हा प्लॅन एकदा खरेदी केल्यास 365 दिवस वापरता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here