Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

प्रतीकात्मक फोटो
Highlights
  • Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी इत्यादींची माहिती समोर आली आहे.
  • फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाऊ शकतो.
  • काही दिवसांपूर्वी जियो फोन 5G चा फोटो ऑनलाइन दिसला होता.

रिलायन्सचा जियो फोन 5G यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. परंतु, ह्या फोनच्या लाँचबद्दल कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं फोनचे काही फोटोज ऑनलाइन शेयर केले होते. आता टिपस्टर अभिषेक यादवनं ह्या फोनच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे.

टिपस्टर अभिषेक यादवनं ट्वीट करून Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी, ऑपरेटिंग सिस्टम, कॅमेरा आणि बॅटरीची माहिती लीक केली आहे.

Jio 5G Phone स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले : ह्या किफायतशीर फोनमध्ये ग्राहकांना 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळेल.
  • प्रोसेसर : तसेच स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस SM4350 प्रो प्रोसेसर दिला जाईल.
  • ओएस : Jio Phone 5G अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाऊ शकतो.
  • कॅमेरा : ह्या फोनचा कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या मागच्या बाजूस 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर मिळेल फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळेल.
  • बॅटरी : 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी फोनमध्ये दिली जाईल.
  • कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स : कनेक्टिव्हिटीसाठी ह्या डिवाइसमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, वाय-फाय 5 आणि सिक्योरिटीसाठी साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट मिळेल.

Jio Phone 5G प्राइस (लीक)

जियो फोन 5जी बद्दल सांगितलं जात आहे की ह्या मोबाइलची किंमत भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच लीकनुसार Jio Phone 5G यंदा दिवाळी नंतर भारतीय बाजारात येऊ शकतो. म्हणजे मुकेश अंबानी नवीन 5जी फोन नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान लाँच करू शकतात.

Jio Phone 5G लाँच टाइमलाइन (संभाव्य)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या यंदाच्या अ‍ॅन्युअल जनरल मीटिंग दरम्यान हा फोन सादर होण्याची शक्यता आहे. परंतु ऑफिशियल डिटेल्सपूर्वीच ह्या फोनची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here