वर्षाला 13 रिचार्ज करण्याची गरज नाही! 30 दिवस पुरतील जियोचे ‘हे’ प्लॅन, किंमत 181 पासून सुरु

Highlights

  • Jio कडे 30 दिवसांचे एकूण पाच रिचार्ज प्लॅन आहेत.
  • Jio Rs 181, Rs 241 आणि Rs 301 प्लॅन डेटा व्हाउचर आहेत.
  • Jio नं अलीकडेच Rs 349 plan सादर केला होता, ज्यात डेली डेटा मिळतो.

टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं अलीकडेच 30 दिवस वैधता असलेला आपला नवीन प्री-पेड प्लॅन लाँच केला होता. त्यानंतर जियो युजर्सकडे एकूण 6 असे प्री-पेड प्लॅन झाले आहेत ज्यात 30 दिवसांची वैधता मिळते. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला जियोच्या या 6 प्लॅनबाबत सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला 28 दिवस नव्हे तर एकूण 30 दिवसांची वैधता मिळेल.

जियोचे 30 दिवस वैधता असलेले प्लॅन

  • 349 रुपयांचा प्लॅन
  • 296 रुपयांचा प्लॅन
  • 259 रुपयांचा प्लॅन
  • 181 रुपयांचा प्लॅन
  • 241 रुपयांचा प्लॅन
  • 301 रुपयांचा प्लॅन

jio 5g works on 4g sim

349 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जियोच्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच यात डेली 2.5जीबी डेटा (एकूण 75GB डेटा) मिळतो. यात फ्री कॉलिंग, डेली 100एसएमस आणि जियो अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील देण्यात आलं आहे. हे देखील वाचा: सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर

296 रुपयांचा प्लॅन

फ्री कॉलिंग आणि नो डेली डेटा लिमिट असलेला हा जियोचे एकमेव प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग करता येते. तसेच या रिचार्जमध्ये डेली 100 SMS फ्री मिळतील, जे कोणत्याही नंबरवर पाठवता येतील. तसेच, प्लॅनमध्ये जियो अ‍ॅप्स (Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि JioCloud) चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. त्याचबरोबर प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 25जीबी डेटा मिळतो.

Jio Calendar Month Plan Rs 259

रिलायन्स जियोनं गेल्यावर्षी ‘कॅलेंडर मंथ प्लॅन’ सादर केला होता. म्हणजे जर एखाद्या महिन्यात 30 दिवस असतील तर हा Jio plan 30 दिवसांची वॅलिडिटी देईल आणि जर 31 दिवसांचा महीना असेल तर रिलायन्स जियोच्या या प्लॅन प्लॅनमध्ये 31 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. त्याचबरोबर प्लॅनमध्ये डेली 1.5 जीबी 4जी इंटरनेट डेटासह रोज 100 एसएमएस देखील मिळतील. तसेच जियो युजर्सना जियो अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

Reliance Jio Adds Over 29 Lakh Mobile Subscribers Before Ambani 5G Service

जियो डेटा व्हाउचर

181 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 30जीबी डेटा आणि 30 दिवसांची वैधता मिळेल. कॉलिंग, SMS आणि इतर कोणतेही बेनिफिट्स या प्लॅनमध्ये मिळणार नाहीत. हे देखील वाचा: Nothing Phone (2) येतोय! सीईओनी दिली माहिती; यावेळी भिडणार आयफोनशी?

241 रुपयांचा प्लॅन: हा 30 दिवसांची वैधता असलेला जियोचा डेटा व्हाउचर आहे, ज्यात 40जीबी डेटा मिळतो.

301 रुपयांचा प्लॅन: या रिचार्जमध्ये जियो 50जीबी डेटा आणि 30 दिवसांची वैधता देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here