जियो देत आहे तुमच्या आवडीचा नंबर निवडण्याची संधी; 499 रुपयांमध्ये पोस्टपेड युजर्सना नंबर निवडण्याची मुभा

Highlights

  • Jio आता आपल्या युजर्सना त्यांच्या आवडीनुसार पोस्टपेड नंबर निवडू देत आहे.
  • ही सर्व्हिस कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर आली आहे.
  • युजर फक्त 499 रुपये देऊन त्यांच्या आवडीचा खास नंबर घेऊ शकतात.

जियो आता आपल्या युजर्सना त्यांनी दिलेल्या 4 आकडी कॉम्बिनेशनवरून पोस्टपेड नंबर निवडण्याची संधी देत आहे. टेक वेबसाइट MySmartPrice नं सर्वप्रथम ही सेवा कंपनीच्या वेबसाइटवर पाहिली आहे. वेबसाइटनुसार, Jio Choice Number ची सुविधा नव्या जियो पोस्टपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. सर्व युजर्सना ओटीपीच्या माध्यमातून साइन इन करावं लागेल आणि आपल्या आवडीचा नंबर निवडण्यासाठी 4 अंकी कॉम्बिनेशन द्यावं लागेल.

जियो पोस्टपेड युजर्सना आवडीचा नंबर निवडण्याची संधी

या नव्या सर्व्हिसला टेलिकॉम कंपनीनं जियो चॉईस नंबर असं नाव दिलं आहे. सध्या ही सेवा फक्त पोस्टपेड युजर्स पूर्ती मर्यादित आहे. यासाठी ग्राहकांना आपल्या आवडीचा नंबर निवडावा लागेल, 499 रुपयांची बुकिंग अमाऊंट दिल्यावर बुकिंग कोड मिळेल आणि डिलिव्हरी शेड्युल करून सिम अ‍ॅक्टिव्हेट करावं लागेल.

वेबसाइटवर तुम्हाला 4 अंकी कॉम्बिनेशन विचारला जाईल. हे कॉम्बिनेशन तुमच्या आवडीचं वर्ष, जन्मतारीख, अ‍ॅनिव्हर्सरी किंवा इतर कुठलंही नंबर असू शकतो. 4 अंक दिल्यावर वेबसाइट तुम्हाला अनेक पर्याय देखील ज्यात शेवटी तुम्ही दिलेले चार अंक असतील. तुम्हाला हवा असलेला नंबर मिळाला की बुकवर क्लिक करून 499 रुपयांचं पेमेंट करा म्हणजे सिम तुमच्या घरी येईल. नवीन नंबर 15 दिवसांच्या आत बुक केलेल्या सर्कल्समध्ये ऍक्टिव्हेट करणं आवश्यक आहे.

वोडाफोन आयडिया अर्थात वि देखील अशीच एक सुविधा गेली कित्येक दिवस देत आहे. परंतु कंपनी व्हीआयपी नंबर्सची ही सेवा पोस्टपेडसह प्रीपेड ग्राहकांना देखील देत आहे. ज्यांना असे नंबर्स हवे असतील ते आपल्या आवडीचं कॉम्बिनेशन देऊ शकतात किंवा फ्री प्रीमियम नंबर्समधून एकाची निवड करू शकतात.

तुमच्या आवडीचा जियो पोस्टपेड निवडण्याची पद्धत

खाजगी जियो पोस्टपेड नंबर निवडण्याची पद्धत अगदी सरळसोपी आहे. पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आवडीचा जियो पोस्टपेड नंबर निवडू शकता.

  • जियो चॉईस नंबरच्या अधिकृत पेजला भेट द्या.
  • गेट स्टारटेडवर क्लिक करा.
  • तुमचा सध्याचा नंबर ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी द्या.
  • तुमच्या आवडीचे अंक, नाव आणि पिन कोड टाका.
  • दिलेल्या पर्यायांमधून तुमच्या आवडीचा नंबर निवडा.
  • त्यांनतर तुमच्या आवडीच्या नंबर पुढील बुकवर क्लिक करा.
  • तुमच्या आवडीचा नंबर मिळवण्यासाठी 499 रुपयांचं पेमेंट करा.
  • तुम्हाला एक बुकिंग कोड येईल.
  • आलेला बुकिंग कोड जियो एजेंटला देखील द्यावा लागेल.
  • तुमचा जियो नंबर बुकिंग नंतर 15 दिवसांच्या आत ऍक्टिव्हेट करा
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here