Jio Vs Airtel Vs BSNL: जियो, एयरटेल की बीएसएनएल 24 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाचा रिचार्ज आहे बेस्ट

रिलायन्स जियो आणि भारती एयरटेलला सरकारी कंपनी बीएसएनएल चांगली टक्कर देत आहे. देशातील टेलीकॉम ग्राहकांना कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स असलेले प्लॅन आवडतात. परंतु काही लोक सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी फक्त इनकमिंग कॉलसाठी रिचार्ज करतात. अशा लोकांसाठी तिन्ही कंपन्यांकडे 24 दिवसांचे प्लॅन आहेत. या आर्टिकलमध्ये आपण बीएसएनएल, एयरटेल आणि जियोच्या 24 दिवसांच्या प्लॅन्सची तुलना करणार आहोत.

Jio Vs Airtel Vs BSNL चे 24 दिवसांचे रिचार्ज

या आर्टिकलमध्ये आपण ज्या प्लॅन्सबाबत बोलणार आहोत त्यात Airtel Rs 155 Plan, Jio Rs 179 Plan आणि BSNL PV_153 चा समावेश आहे. या तिन्ही रिचार्जमध्ये जवळपास एक सारखे कॉलिंग, डेटा व एसएमएस बेनिफिट्स मिळतात चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती. हे देखील वाचा: 240km range सह लाँच झाली नवी Electric Scooter; प्राइस 70 हजारांपेक्षा कमी!

Airtel Rs 155 चा रिचार्ज प्लॅन

अलीकडेच एयरटेलनं आपला 155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन सादर केला होता जो 24 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. 155 रुपयांच्या एयरटेल रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 जीबी 4G डेटा दिला जातो. सोबत एकूण 300 एसएमएस मिळतात. प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच एयरटेल या प्लॅनमध्ये मोफत हेलोट्यून्स आणि फ्री विंक म्यूजिक सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

Jio Rs 179 चा रिचार्ज प्लॅन

179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 24 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्रीपेड प्लॅनमध्ये रोज 1 जीबी डेटा दिला जातो, म्हणजे एकूण 24जीबी डेटा. रोजचा डेटा संपल्यावर डेटा स्पीड 64Kbps होतो. रिलायन्स जियोच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एसएमएस रोज मिळतात. तसेच जियोटीव्ही, जियोसिनेमा, जियोक्लाउड आणि जियोसिक्योरिटीचं मोफत सब्सक्रिप्शन देखील मिळतं.

BSNL Rs 153 चा रिचार्ज प्लॅन

सरकारी कंपनी बीएसएनएलनं ग्राहकांसाठी 153 रुपयांच्या शानदार प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 24 नव्हे तर 26 दिवसांची वैधता मिळते. तसेच ग्राहक अमर्याद कॉलिंगचा देखील फायदा घेऊ शकतात. फक्त कॉलिंग नव्हे तर या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी रोज 1GB डेटा देखील देत आहे. डेली लिमिट संपल्यावर देखील तुम्ही 40Kbps स्पीडनं इंटरनेट वापरू शकता. तसेच युजर्सना रोज 100 SMS देखील मोफत मिळतील. प्लॅनमधील Free PRBT सर्व्हिसच्या मदतीनं मोफत हॅलो ट्यून सेट करता येईल.

नोट: किंमत, डेटा आणि वैधतेच्या बाबतीत बीएसएनएल एयरटेल आणि जियोला मागे टाकत आहे. तर खाजगी कंपन्यांमध्ये जियोचा प्लॅन एयरटेलचा मात देत आहे. हे देखील वाचा: जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच; वनप्लस-सॅमसंगचा टेंशन वाढलं

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here