Realme V30 आणि Realme V30t ची दणक्यात एंट्री! तुमच्या बजेटमध्ये बसतायत का पाहा

Highlights

  • Realme V30 आणि Realme V30T ऑफिशियल वेबसाइट लिस्ट झाले आहेत.
  • हे फोन 6जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतात, ज्यामुळे फोनला 14जीबी रॅमची पावर मिळते.
  • रियलमी वी30 आणि वी30टी सर्वप्रथम चायनामध्ये सेलसाठी उपलब्ध होतील.

Realme V30 आणि Realme V30T स्मार्टफोन येत्या 9 फेब्रुवारीला लाँच होणार आहेत. परंतु मार्केटमध्ये येण्यापूर्वीच हे दोन्ही मोबाइल फोन्स कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर प्राइससह लिस्ट करण्यात आले आहेत. या दोन्ही रियलमी स्मार्टफोन्सच्या फोटो, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. रियलमी वी30 आणि वी30टी सर्वप्रथम चायनामध्ये सेलसाठी उपलब्ध होतील आणि नंतर अन्य बाजारांमध्ये एंट्री करतील.

Realme V30 आणि Realme V30T ची किंमत

रियलमी वी30 आणि वी30टी दोन्ही स्मार्टफोन्स दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. यांच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. Realme V30 ची प्रारंभिक किंमत 13 हजार तर Realme V30T ची स्टार्टिंग प्राइस 15 हजारांच्या आसपास आहे. दोन्ही रियलमी मोबाइल Dark Night आणि Dawn Gold कलरमध्ये आले आहेत, ज्याची सेल डेट 9 फेब्रुवारीला समजेल. हे देखील वाचा: भारत सरकारनं घातली 232 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; लोन आणि सट्टेबाजीवर डिजिटल स्ट्राइक

Realme V30 आणि Realme V30T चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • MediaTek Dimensity 700
  • 13MP + 8MP rear camera
  • 10W 5,000mAh battery

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता रियलमी वी30 आणि वी30टी स्मार्टफोन 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 600निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. दोन्ही स्मार्टफोन्स फ्लॅट फ्रेम डिजाइनवर बंडले आहेत ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

हे नवीन रियलमी मोबाइल फोन अँड्रॉइड 12 ओएसवर बनले आहेत तसेच रियलमी युआय 3.0 सह चालतात. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोन्समध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हे फोन 6जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतात ज्यामुळे फोनला 14जीबी रॅमची पावर मिळते. पावर बॅकअपसाठी Realme V30 आणि Realme V30T दोन्ही स्मार्टफोन्स 5,000एमएएच बॅटरीसह येतात जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: 8GB RAM आणि 48MP Camera सह स्वस्त POCO X5 5G लाँच, सर्व स्पेसिफिकेशन्स आहेत शानदार

फोटोग्राफीसाठी Realme V30 आणि Realme V30T च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हे फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here