भारती एयरटेल आणि वोडाफोन आइडियाने आपले प्लान्स सादर केले आहेत जे आधीपेक्षा महाग आहेत. त्याचप्रमाणे जियो पण आपले प्लान्सचे दर वाढवणार आहे. जियो 6 डिसेंबर पासून आपले ऑल इन वन प्लान्सच्या किंमतीत 40 टक्के वाढ करेल. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच नुसार टॅरिफ प्लान्स महाग झाल्यानंतर पण जियोचे प्लान्स बाकी टेलिकॉम ऑपरेटर्सच्या प्लान्स पेक्षा 15%-20% स्वस्त असतील.
जियोने रविवारी आपले प्लान्स महाग करण्याची घोषणा केली होती. जियोचे नवीन प्लान्स 6 डिसेंबर पासून लागू होतील. अजून कंपनीने नवीन प्लान्सची माहिती दिली नाही. जियो 6 डिसेंबरला आपल्या नवीन प्लान्सची माहिती देईल.
वोडाफोन आइडिया आणि एयरटेल नंतर रिलायंस जियो नवीन टॅरिफ प्लान्सची घोषणा करेल. तसेच एयरटेल आणि वोडाफोन आइडिया 3 डिसेंबर म्हणजे आज पासून आपले नवीन प्लान्स लागू करेल. एयरटेलच्या वेबसाइट वर आता नवीन प्लान दिसू लागले आहेत.
जियोने आपल्या एका स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे कि 6 डिसेंबर पासून मोबाईल टॅरिफ 40 टक्क्यांपर्यंत वाढवले जातील. तसेच कंपनीने सांगितले कि मोबाईल सर्विस रेट्स ऑल इन वन प्लान्स अंतर्गत वाढवले जातील, ज्यात ग्राहकांना 300 टक्क्यांपर्यंत फायदा पण दिला जाईल.
तसेच कंपनी म्हणत आहे कि जियो यूजर्ससाठी लवकरच नवीन ऑल इन वन प्लान सादर केले जातील, ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड वॉयस आणि डेटा मिळेल. पण नवीन प्लान्स 40 टक्के महाग असतील. जे ‘कस्टमर्स फर्स्ट’ वायद्या अंतर्गत ग्राहकांना 300 टक्के जास्त फायदा देतील.














