Lava Agni 2 5G भारतात लाँच; 8GB RAM, 256GB स्टोरेज, 66W फास्ट चार्जिंग आणि बरंच काही

Highlights

  • Lava Agni 2 5G 8GB RAM सह भारतात लाँच
  • फोन 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो
  • MediaTek Dimensity 7050 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे

भारतीय मोबाइल कंपनी लावानं आज देशासमोर आपला नवीन 5जी फोन सादर केला आहे. हा मोबाइल Lava Agni 2 5G नावानं भारतात लाँच केला आहे जो साल 2021 मध्ये आलेल्या अग्नी 5जी फोनचा अ‍ॅडव्हान्स , पावरफुल आणि नेक्स्ट जेन व्हर्जन आहे. पुढे तुम्ही लावा अग्नी 2 5जी प्राइस, सेल, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची सर्व माहिती वाचू शकता.

लावा अग्नी 2 5जी ची किंमत

  • 8GB RAM + 256GB Memory = 21,999 रुपये

Lava Agni 2 5G फोन भारतीय बाजारात सिंगल मेमरी वेरिंएटमध्ये लाँच झाला आहे. ह्यात 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. या फोनची विक्री येत्या 24 मे पासून शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरून सुरु होईल. फोन खरेदी करताना कंपनी बँक कार्ड्सवर 2,000 रुपयांचा डिस्काउंट देखील देत आहे ज्यामुळे इफेक्टिव्ह प्राइस 19,999 रुपये होईल.

लावा अग्नी 2 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • Curved AMOLED Display
  • In-Display Fingerprint

Lava Agni 2 5G चा लुक खूप प्रीमियम आहे. हा मोबाइल फोन कंपनीनं कर्व्ड एज डिस्प्लेसह लाँच केला आहे ज्यात स्क्रीन दोन्ही बाजूंनी बॅक पॅनलच्या दिशेने वळली आहे. ही अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. फोनमध्ये 6.78 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते.

  • 8GB Virtual RAM
  • MediaTek Dimensity 7050

Lava Agni 2 5G लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएससह लाँच झाला आहे तसेच 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा लावा मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून फोन 16जीबी रॅमची ताकद देतो.

  • 50MP Quad Camera

फोटोग्राफीसाठी लावा अग्नी 2 5जी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

  • 4,700mAh battery
  • 66W Fast Charging

पावर बॅकअपसाठी लावा अग्नी 2 5जी फोनमध्ये 4,700एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फोन फक्त 16 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here