Nokia XR21 rugged phone झाला लाँच; धूळ, पाणी, गर्मी आणि थंडीत देखील चालेल सुसाट

Highlights

  • Nokia XR21 मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड स्मार्टफोन आहे
  • फोन आयपी69 रेटिंगसह आला आहे ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतो
  • फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे

नोकिया बाबत काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपला नवीन रग्ड स्मार्टफोन (rugged phone) वर काम करत आहे ज्याचा नाव Nokia XR30 असेल. परंतु कंपनीनं सर्वांना धक्का देत Nokia XR21 नावानं आपला नवीन मोबाइल फोन लाँच केला आहे. हा MIL-STD-810H military-grade सर्टिफाइड फोन आहे जो बिकट परिस्थिती देखील चालू शकतो.

नोकिया एक्सआर21 स्मार्टफोनचे फिचर

  • IP69K Rating
  • high-pressure
  • high-temperature
  • MIL-STD-810H certification

Nokia XR21 मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड स्मार्टफोन आहे त्यामुळे हा मजबूत बॉडी असलेला फोन बनतो. दगडासारख्या मजबूत वस्तूवर पडल्यावर देखील हा फुटत नाही. तसेच फोन आयपी69 रेटिंगसह आला आहे ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. हे देखील वाचा: फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

हा नोकिया फोन दीर्घकाळ पाण्यात किंवा चिखलात, धुळीत पडल्यावर देखील सुरक्षित राहू शकतो. तसेच अतिशय उष्ण किंवा थंड वातावरणात देखील हा फोन सहज चालू शकतो. फोन इतर फोन्सच्या तुलनेत जास्त प्रेशर झेलू शकतो. म्हणजे मोठं वजन ठेवलं तरी याला काही होणार नाही.

नोकिया एक्सआर21 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia XR21 स्क्रीन

  • 6.49″ FHD+ LCD
  • 120Hz refresh rate

नोकिया एक्सआर21 स्मार्टफोन 6.49 इंचाचा मोठ्या स्क्रीनसह लाँच करण्यात आला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनवर काम करतो. हा डिस्प्ले आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसच्या सुरक्षेसह येते आणि ग्लव्ह घालून देखील वापरता येते.

Nokia XR21 प्रोसेसर

  • Qualcomm Snapdragon 695
  • 6GB RAM + 128GB storage

हा नोकिया फोन अँड्रॉइड 12 सह लाँच झाला आहे जो 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेट व 3 वर्षांच्या अँड्रॉइड ओएस अपडेटसह आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. Nokia XR21 6जीबी रॅमसह 128जीबी मेमरीला सपोर्ट करतो जी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

Nokia XR21 कॅमेरा

  • 64MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी हा नोकिया मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Nokia XR21 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.5 अपर्चरवर चालतो.

Nokia XR21 बॅटरी

  • 33W Fast Charging
  • 4,800mAh Battery

पावर बॅकअपसाठी नोकिया एक्सआर21 स्मार्टफोनमध्ये 4,800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी कंपनीनं आपला नवीन मोबाइल 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हे देखील वाचा: Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन

नोकिया एक्सआर21 ची किंमत

Nokia XR21 कंपनीनं सिंगल मेमरी व्हेरिएंट सादर केला आहे ज्यात 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज आहे. या फोनची किंमत £499 आहे जी भारतीय करंसीनुसार 51,000 रुपयांच्या आसपास आहे. हा नोकिया फोन ग्लोबल मार्केटमध्ये Midnight Black आणि Pine Green कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here