सध्या जरी भारतीय बाजारावर चीनी मोबाईल निर्मात्यांचे राज्य असले तरी एक काळ होता जेव्हा कोरियन कंपनीचा दबदबा होत. एलजी आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांकडे भारतीय मोबाईल बाजाराचा मोठा भाग होता. जरी हालांकि आजही सॅमासंग कायम असली तरी एलजी कुठेच नाही. परंतु आता पुन्हा एकदा एलजी जबरदस्तरित्या परत येण्यासाठी तयार आहे. कंपनी लवकरच आपली नवीन सीरीज सादर करणार आहे जो खासकरून भारतीय मोबाईल बाजार लक्षात ठेऊन बनवण्यात आला आहे. 91मोबाईल्सला याची खास माहिती मिळाली आहे. सोबतच आम्हाला फोनची पोस्टर ईमेज पण मिळाली आहे ज्यावरून तुम्ही डिजाइन आणि कॅमेरा सहित इतर अनेक प्रकारची माहिती मिळवू शकता.
आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्या नुसार एलजी ची हि नवीन सीरीज फक्त ऑनलाइन स्टोर वरच सेल साठी उपलब्ध होईल. पण आता पर्यंत कंपनीच्या या नवीन सीरीजचे नाव तर समजले नाही पण फोनचे काही स्पेसिफिकेशन आणि प्राइसची थोडी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार कंपनी हा कमी रेंज मध्ये लॉन्च करणार आहे.

पोस्टर मधेच फोनच्या ट्रिपल कॅमेऱ्याचा खुलासा होत आहे. पहिल्यांदाचकं पनीने वर्टिकल शेप मध्ये कॅमेरा सादर केला आहे. आता पर्यंत एलजी फोन मध्ये होरिजेंटल स्टाइल मधेच कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच बॅक पॅनल मध्ये तुम्ही ग्रेडियंट कलर बघू शकता. बॉडी ग्लासची आहे कि पॉलिकार्बोनेट याची माहिती मिळाली नाही पण ग्लोसी स्टाइल दिसत आहे. याचे साइड पॅनल कार्व्ड आहेत आणि तिथे वॉल्यूम आणि पावर बटण उपलब्ध आहे. तसेच मागील पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअप पाहता एक साथ तीन कॅमेरा उपलब्ध आहेत पण सर्वात खालचा वेगळ्या लाल रंगात हाइलाइट केला गेला आहे. तसेच कॅमेरा खाली एलईडी फ्लॅश उपलब्ध आहे. तसेच एका पोस्टर मध्ये एआई कॅमेरा चा पण उल्लेख केला गेला आहे. जरी अजून डिस्प्ले बद्दल कोणतीही माहिती मिळाली नसली तरी पोस्टर मध्ये फुल व्यू डिस्प्ले बद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही आशा करू शकता कि कंपनी नॉच किंवा पूर्णपणे बेजल लेस फोनची तयारी करत आहे. फोनचा लुक आणि स्टाइल बघून म्हणता येईल कि कंपनी यावेळी शाओमी सॅमसंग सहित इतर कंपन्यांना टक्कर देणार आहे.














