दक्षिण कोरियन कंपनी LG ने कालच स्मार्टफोन बाजाराचा निरोप घेतला. याआधी अनेक लीक रिपोर्टमध्ये असा दावा केला होता. सोमवारी कंपनीने अधिकृतपणे हि माहिती दिली आहे. कंपनीला जवळपास सहा वर्षे तोटा सहन केल्यानंतर एलजीने स्मार्टफोन बाजाराला रामराम ठोकला आहे. यावरून स्पष्ट झाले आहे कि आता बाजारात एलजीचे फोन्स दिसणार नाहीत. पण, आता एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एक नवीन एलजी स्मार्टफोन एआय बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. या फोनबद्दल बोलले जात आहे कि हा कंपनीचा शेवटचा फोन असेल, जो LG V70 नावाने सादर केला जाईल. चला एक नजर टाकूया LG V70 स्मार्टफोन AI बेंचमार्क स्कोरवर काय माहिती समोर आली आहे. (LG V70 spotted on AI benchmark with Snapdragon 888 SOC)
LG V70 AI Benchmark
एलजी वी 70 स्मार्टफोन अलीकडेच एआय बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मनुसार, LG V70 लेटेस्ट फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसरवर चालतो जो 8GB रॅमसह येईल. विशेष म्हणजे एलजी वी 70 ने सॅमसंग गॅलेक्सी एस 21 लाइनअप स्मार्टफोनच्या तुलनेत चांगला स्कोर मिळवला आहे.
हे देखील वाचा : Oppo F19 स्मार्टफोन दमदार 5000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
लॉन्च होईल का LG V70
आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे कि एलजी आपला एलजी वी70 लॉन्च करेल का? हा ब्रँडचा शेवटचा स्मार्टफोन असेल? हा डिवाइस अनेक दिवस लीक आणि अफवांमध्ये दिसत आहे आणि नवीन एआय बेंचमार्क लिस्टिंग पाहता असे बोलले जात आहे कि एलजी वी70 लॉन्च केला जाऊ शकतो.
कधीपर्यंत मिळतील LG चे फोन?
एलजीने सांगितले कि आपला स्टॉक संपवण्यासाठी आता फोन्स बाजारात उपलब्ध करवून देत आहे. कंपनी एका निश्चित कालावधीसाठी ग्राहकांना सर्विस सपोर्ट आणि सॉफ्टवेयर अपडेट पण जारी करेल. रिपोर्ट्सनुसार, एलजीने आधीच काही कर्मचाऱ्यांना फोन डिविजनवरून बिजनेस यूनिटमध्ये शिफ्ट करायला सुरुवात केली आहे.
एलजी मोबाईल होती तोट्यात
काउंटरपॉइन्ट रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 मिलियन यूनिट्स शिप केले आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेयर एकूण 2 टक्के होता. पण स्वस्त चायनीज मोबाईल कंपन्या प्राइस वॉर समोर ते व्यावसायिकरित्या यशस्वी होऊ शकले नाहीत. याआधी यावर्षी एलजीने म्हटले होते कि कंपनी आपल्या स्मार्टफोन बिजनसचे चिंतन करेल. कंपनीने अनेक ऑप्शन जसे कि स्मार्टफोन यूनिटची विक्री करण्याबाबत पण विचार केला होता.