Oppo F19 स्मार्टफोन दमदार 5000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo ने भारतात आज Oppo F19 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo F19 ची डिजाइन या स्मार्टफोनची खासियत आहे, जो 7.95mm जाड आहे आणि हा 5000mAh बॅटरी आणि 33w फास्ट चार्ज सपोर्टसह सादर केला गेला आहे. ओप्पोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये शानदार AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 48मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. स्लीक बॉडी डिजाइनसह लॉन्च ओप्पोच्या लेटेस्ट स्मार्टफोनचे वजन फक्त 175g आहे. इथे आम्ही तुम्हाला लेटेस्ट Oppo F19 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमत सांगणार आहोत. (Oppo F19 price in India revealed check price specifications sale date)

Oppo F19 डिस्प्ले आणि डिजाइन

Oppo F19 स्मार्टफोनमध्ये 16.34CM चा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 90.8% आणि रिजोल्यूशन 2400 × 1080 पिक्सल आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह लॉन्च होईल स्वस्त 5G फोन OPPO A74

डिजाइन पाहता Oppo चा हा स्मार्टफोन शानदार स्लीक डिजाइनसह सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनची जाडी फक्त 7.95mm आहे. 3D कर्व्ड डिजाइनसह लॉन्च झालेल्या Oppo च्या लेटेस्ट स्मार्टफोनबाबत कंपनी म्हणते कि याचा इन-हॅन्ड फील खूप कम्फर्टेबल आहे, 5000mAh बॅटरीसह येणाऱ्या या फोनचे वजन फक्त 175 ग्राम आहे.

Oppo F19 कॅमेरा

Oppo F19 स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये LED फ्लॅश पण मिळत आहे. Oppo F19 स्मार्टफोनचा प्राइमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, त्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा पाहता, ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Lenovo Legion 2 Pro होईल 16GB रॅम आणि अनोख्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च

Oppo F19 परफॉर्मन्स

Oppo F19 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 662 चिपसेटसह सादर केला गेला आहे. ओप्पोच्या स्मार्टफोनमध्ये स्मूद परफॉर्मन्ससाठी 6GB चा LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे. Oppo F19 स्मार्टफोन कंपनीच्या लेटेस्ट कस्टम युजर इंटरफेस ColorOS 11.1 वर चालतो. तसेच सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरफ्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Oppo F19 किंमत

Oppo F19 स्मार्टफोन सिंगल वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. Oppo F19 स्मार्टफोन 18,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हि किंमत या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आलेल्या वेरीएंटची आहे. Oppo F19 स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. या फोनचा पहिला सेल ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केटमध्ये 9 एप्रिल 2021 पासून सुरु होईल.

ओपो एफ19 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here