Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट

Highlights

  • Realme C-series स्मार्टफोन्समध्ये iPhone Dynamic Island डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • कंपनी याला Realme Mini Capsule असं नाव देऊ शकते.
  • रियलमी व्हीपी माधव सेठ यांनी ही माहिती एके ट्वीटमधून दिली आणि नंतर डिलीट केली.

iPhone 14 series मध्ये Apple नं आपल्या मोबाइल्सची स्क्रीन स्टाईल बदलून Dynamic Island डिस्प्ले सादर केला आहे. नॉच आणि पंच-होलचं हे मिश्रण लोकांना खूप आवडलं. आता अशीच डिस्प्ले डिजाईन Realme C-series च्या स्मार्टफोन्समध्ये देखील मिळू शकते. कंपनीचे व्हीपी माधव सेठ यांनी ट्वीटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे ज्याला ‘Realme Mini Capsule’ असं नाव देण्यात आलं आहे.

Realme Vice President Madhav Sheth यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून काल घोषणा केली होती की, कंपनीच्या ‘सी’ सीरीज स्मार्टफोन्समध्ये Realme Mini Capsule डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन स्टाईल मोठ्या प्रमाणावर iPhone 14 Pro आणि Pro Max सारखी होती. रियलमी फॅन्स हे पाहून खूप उत्सुक झाले होते परंतु काही तासांनी माधव सेठ यांनी हे ट्वीट डिलीट केलं. हे देखील वाचा: असे असतील Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स; लाँचपूर्वीच लीक झाली महत्वाची माहिती

Realme C-series स्मार्टफोन्समधील हे मिनी कॅप्सूल फिचर पाहून ब्रँडचे फॉलोवर्स जितके खुश झाले होते, तेवढेच माधव सेठ यांनी ट्वीट डिलीट केल्यावर नाराज झाले आहेत. लोकांना आशा होती की आगामी Realme C55 मध्ये ही नवीन डिस्प्ले स्टाईल मिळेल, परंतु आता यावर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. महागड्या आयफोन सारखा डिस्प्ले स्वस्त रियलमी फोन्समध्ये मिळेल की नाही या माहितीसाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल.

Realme C55

रियलमी सी55 बद्दल बोलायचं झालं तर याबाबत अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत. अलीकडेच याबाबत सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो. तसेच रिपोर्टनुसार रियलमी सी55 भारतीय बाजारात Rainforest (Green), Rainy Night (black) आणि Sunshower (orange) कलरमध्ये विकला जाईल. हे देखील वाचा: सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; चार्जिगविना धावते 150KM

हा स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS सह अनेक ठिकाणी लिस्ट झाला आहे. हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह लाँच होईल जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते, अशी चर्चा आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व लाँच डिटेल्ससाठी आता कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here