OnePlus Nord 3 ची वाट पाहत असाल तर नक्की वाचा; स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती लीक

Highlights

  • OnePlus Nord 3 ची लाँच टाइमलाइन लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • यात 12GB RAM आणि MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • वनप्लस नॉर्ड 3 80W SuperVOOC टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.

अलीकडेच बातमी आली होती की OnePlus 11 आणि OnePlus 11R नंतर कंपनी आपल्या ‘नोर्ड’ सेग्मेंटमध्ये देखील नवीन मोबाइल फोन सादर करेल. या फोनचं नाव OnePlus Nord 3 असेल, असं सांगण्यात आलं होतं. आता नवीन लीकमध्ये या स्मार्टफोनच्या लाँच डिटेल सह अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आणि 80W SuperVOOC चार्जिंग आधी काही या फोनची वैशिष्ट्ये असतील. संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord 3 काही लाँच होणार

टेक वेबसाइट माय स्मार्ट प्राइसनं या मोबाइल फोनची लाँच टाइमलाइन शेयर केली आहे. रिपोर्टनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोन दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला मार्केटमध्ये एंट्री करेल. अर्थात हा वनप्लस फोन मिड जून किंवा जुलैमध्ये लाँच होऊ शकतो. म्हणजे Nord 3 5G को बाजारात येण्यास अजून काही काळ आहे. हे देखील वाचा: सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; चार्जिगविना धावते 150KM

OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ AMOLED 120Hz display
  • 12GB RAM + 256GB storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP triple rear camera
  • 16MP selfie camera
  • 80W SuperVOOC charging
  • 5000mAh battery

रिपोर्टनुसार वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेन्सिटी 9000 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. ही मोबाइल चिप 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनली आहे आणि 5जीला सपोर्ट करते. नॉर्ड 3 बद्दल सांगितलं जात आहे की हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये बाजारात येऊ शकतो. यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तसेच 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

OnePlus Nord 3 मध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असेल, असं सांगण्यात आलं आहे. जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. या वनप्लस मोबाइलमध्ये अलर्ट स्लाइडर देखील मिळेल. हे देखील वाचा: Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट

फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरचा समावेश असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here