Redmi A1 डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध

Redmi A1 Offer: Xiaomi नं आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत लो बजेटमध्ये नंबर सीरिज सादर करणं बंद केलं आहे त्यावजी आता ‘ए’ सीरिज सादर करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये दोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन यंदा सादर करण्यात आले होते. यातील सर्वात स्वस्त Redmi A1 स्मार्टफोन आता मोठ्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. हा फोन 2GB RAM, MediaTek Helio A22 चिपसेट, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आता हा डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध झाला आहे. पुढे Redmi A1 वरील ऑफर्ससह त्याची प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊया.

Redmi A1 वरील ऑफर्स

Redmi A1 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच झाला आहे, ज्यात 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज मिळते. या नव्या रेडमी स्मार्टफोनची एमआरपी 8,999 रुपये आहे परंतु 24 टक्के डिस्काउंट नंतर हा फोन आता 6,799 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. तसेच हा फोन तुम्ही 325 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून Redmi A1 आणखी स्वस्तात विकत घेऊ शकता. हा हँडसेट लाइट ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि लाइट ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Corona नंतर समोर आला Zombie Virus! 48000 वर्षांपासून होता बर्फाखाली, नवीन संकटाची चाहूल?

Redmi A1 Specifications

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तर तळाला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Redmi A1 चे डायमेंशन 164.9x 76.75×9.09 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे.

Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो, त्यामुळे जुन्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स पेक्षा चांगला अनुभव मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी फोन LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 Storage फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here