मुंबई दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांना वाचवणाऱ्या मेजरच्या आयुष्यावरील चित्रपट ओटीटीवर; नेटफ्लिक्सवर होणार स्ट्रीम

दाक्षिणात्य चित्रपट (South Indian Movie) आवडणाऱ्या दर्शकांसाठी खुशखबर समोर आली आहे. Pushpa, KGF आणि RRR सारखे धमाकेदार चित्रपट ओटीटी रिलीज झाल्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवि शेष (Adivi Sesh) चा चित्रपट ‘मेजर’ (Major) देखील OTT वर रिलीज होण्यासाठी तयार आहे. गेल्या महिन्यात 3 जूनला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेला हा पिक्चर आता एका महिन्यानंतर OTT Platform वर उपलब्ध होणार आहे. जर तुम्हाला थियटरमध्ये या शानदार चित्रपटाचा आनंद घेता आला नसेल तर तुम्ही आता घर बसल्या याचा आनंद घेऊ शकता.

या दिवशी होईल मेजर रिलीज

Netflix नं आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक Post करून या चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे. नेटफ्लिक्सनं शेयर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘एका मुलाची कधी न ऐकलेली गोष्ट. एका पित्याची कधी न ऐकलेली गोष्ट. एका सैनिकांची कधी न ऐकलेली गोष्ट. मेजर 3 जुलैला नेटफ्लिक्सवर तेलुगु, हिंदी आणि मल्याळममध्ये येत आहे!’ या पोस्टनंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा चित्रपट ऑफलाईन बघण्यासाठी नेटफ्लिक्सवरून डाउनलोड करता येईल.

शाहिद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यवर आधारित

या चित्रपटाची गोष्ट शाहिद मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या अद्भुत साहस आणि पराक्रमावर आधारित आहे. मेजर संदीप यांनी 2008 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 26/11 ला झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवले होते. लोकांना वाचवत असताना ते शाहिद झाले. चित्रपटात या हल्लीची गोष्ट तर आहेच परंतु शहीद मेजर संदीप यांचं बालपण, प्रेम कहाणी आणि देशासाठी त्यांनी दिलेलं योगदान दाखवण्यात आलं आहे.

बॉक्स ऑफिसवरील कामगिरी

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 1.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 1.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील तीच जादू दाखवतो की नाही ते पाहावं लागेल. अदिवी शेश असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सुपरस्टार महेश बाबूच्या प्रोडक्शन बॅनर अंतर्गत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here