10 लाखांच्या बजेटमध्ये येऊ शकते MG Air EV; रिपोर्ट्समधून आली माहिती

Electric Vehicles ची मागणी कमी होण्याचं नाव घेत नाही, ग्राहकांना स्वस्तात शानदार इलेक्ट्रिक वाहने हवी आहेत. म्हणूनच MG Motors लवकरच आपली new electric car भारतात सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक कारला MG Air EV असं नाव देण्यात येईल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ही ई-कार 5 जानेवारी 2023 ला भारतात लाँच केली जाईल. परंतु कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रिपोर्ट्समध्ये या कारची साइज सांगण्यात आली आहे, त्यानुसार ही भारतातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार आणि entry-level electric car म्हणून सादर केली जाऊ शकते.

10 लाखांच्या आसपास असेल किंमत

बातम्यांनुसार, MG Air EV भारतातील सर्वात अफोर्डेबल इेलक्ट्रिक कार्स पैकी एक असेल. सध्या भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV आहे जिची किंमत Rs 8.49 lakh ते Rs 11.79 lakh (ex-showroom) दरम्यान आहे. तर, MG Air EV जवळपास Rs 10 lakh (ex-showroom) मध्ये सादर केली जाऊ शकते. हे देखील वाचा: Uunchai OTT release Date: मनाला स्पर्श करेल अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा चित्रपट, ऑनलाइन रिलीजची माहिती लीक

MG Air EV च्या इंडोनेशियन मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

विशेष म्हणजे भारतीय बाजारात येण्याआधीच ही इलेक्ट्रिक कार इंडोनेशियामध्ये याच नावानं उपलब्ध झाली आहे, परंतु तिथे ही वूलिंग ब्रँड अंतगर्त विकली जाते कारण ही SAIC ग्रुपचा एक भाग आहे, ज्यामुळे सिस्टर ब्रॅंड्समध्ये मॉडेल्सची देवाणघेवाण करता येते. म्हणजे एकाच कंपनीचे सब ब्रँड एकमेकांचे कार मॉडेल्स कॉपी करू शकतात.

आशा आहे की ऑटोमेकर एमजी भारतात ही कार लाँच करण्यापूर्वी डिजाइनमध्ये काही बदल करेल. इंडोनेशियाई एमजी एयर ईव्ही एक कॉम्पॅक्ट कार आहे जी तीन मीटर पेक्षा कमी लांब आहे आणि यात आधुनिक डिजाइन देण्यात आली आहे. हिच्या फ्रंटला रुंद एक एलईडी पट्टी, वर्टिकली स्टॅक्ड ड्युअल-बॅरल हेडलाइट्स, स्टाइल असलेल्या कव्हरसह 12-इंच स्टील व्हील देण्यात आले आहेत आणि मागे देखील एलईडी बार आहे. हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Samsung Galaxy A54 5G; लाँच पूर्वीच पाहा फोनची झलक

MG Air EV दोन बॅटरी साइज – 17.3kWh आणि 26.7kWh मध्ये सादर केली जाऊ शकतो. मोठी बॅटरी सिंगल चार्जवर 300km ची रेंज देऊ शकते. तसेच छोट्या बॅटरीमधून 200km ची रेंज मिळेल. तसेच यात Dual front airbags, ABS सह EBD आणि rear-view camera असेल. Indonesia मध्ये विकली जाणाऱ्या MG Air EV बद्दल बोलायचं झालं तर या कारमध्ये 10.25-inch screen आहे. तसेच या ई-कारमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here