Mahindra नं अलीकडेच भारतात आपली compact EV SUV Mahindra XUV400 सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक कार सादर झाल्यानंतर भारतातील इलेक्ट्रिक कार बाजार (Indian EV market) मोठ्याप्रमाणावर बदलेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु या कारच्या विक्रीसाठी अजून बराच काळ आहे आणि तुम्हाला जर अशीच ईव्ही हवी असेल तर भारतात अनेक पर्याय आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Tata Nexon EV twins, the MG ZS EV, Hyundai Kona EV आणि आगामी BYD Atto 3 या कार महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारला सहज टक्कर देतात.
Mahindra XUV400 ला टक्कर देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स
1. Tata Nexon EV Prime
2. Tata Nexon EV MAX
3. MG ZS EV
4. Hyundai Kona EV
5. BYD Atto 3
1. Tata Nexon EV Prime
टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइम सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात मजबूत ईव्ही प्रोडक्ट पैकी एक आहे. या कारनं सर्व सेगमेंटमध्ये भारतीय ईव्ही स्पेसमध्ये विक्रीचा 50 टक्के हिस्सा आपल्या नावे केला आहे. टाटाच्या नेक्सॉन ईव्ही प्राइममध्ये स्टाइल, प्रदर्शन, रेंज, आराम आणि सुविधा मिळतात. रेंज बाबत बोलायचं झालं तर टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइम एकदा चार्ज केल्यावर 312 किमी प्रवास करू शकते. तसेच ही फक्त 9 सेकंदांत 0 ते 100 पर्यंतचा वेग गाठू शकते. ही घरी फुल चार्ज होण्यास सुमारे 8 तास लागतात. Nexon EV Prime मध्ये ऑटो एसी, इलेक्ट्रिक सनरूफ, एयरबॅग, डिजिटल MID, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, अलॉय व्हील, हवेशीर सीट्स आणि अन्य अनेक फीचर्स मिळतात. हिची किंमत Rs 14.99 lakh (ex-showroom) पासून सुरु होते. हे देखील वाचा: OTUA Electric Cargo फुल चार्जमध्ये देणार 300km पर्यंत रेंज; ड्रायवर केबिनमध्ये गारगार एसी
2. Tata Nexon EV MAX
Tata Motors नं अलीकडेच आपली इलेक्ट्रिक नेक्सॉनका मोठी रेंज असलेला व्हेरिएंट Nexon EV MAX नावानं सादर केला होता. Tata Nexon EV MAX सिंगल चार्जवर 437km ची रेंज मिळवू शकते. ही 0 ते 100kmph पर्यंतचा स्पीड फक्त 9 सेकंदांत गाठते. Nexon EV MAX मध्ये 140kmph चा टॉप स्पीड मिळतो. Nexon EV MAX मध्ये नवीन alloys, शानदार सस्पेंशन आणि फास्ट चार्जिंगचा ऑप्शन मिळतो. हिची प्रारंभिक किंमत Rs 18.34 lakh (ex-showroom) आहे.
3. MG ZS EV
या सेगमेंटमध्ये MG ZS EV देखील एक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे आणि ही Nexon EV ट्विन्स पेक्षा मोठी आहे. MG ZS EV टेक्नॉलॉजीच्या बाबतीत देखील जास्त शानदार आहे. यात पॅनोरमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल MID आणि इंफोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार फीचर्स, हीटेड ORVM, TPMS आणि 17-इंचाचे अलॉय व्हील मिळतात. इतकेच नव्हे तर MG ZS EV फक्त 8.6 सेकंदांत ताशी 100 किमीचा वेग गाठू शकते. तसेच ही ईव्ही एकदा चार्ज केल्यावर 461 किमीची रेंज देते असा दावा करण्यात आला आहे. या कारची प्रारंभी किंमत Price: Rs 22 lakh (ex-showroom) आहे.
4. Hyundai Kona EV
Hyundai Kona EV बाजारात उपलब्ध असलेल्या जुन्या इलेक्ट्रिक कार्स पैकी एक आहे. ही कार आधुनिक डिजाइन आणि फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. Kona EV मध्ये 136 hp (395 Nm) मोटर मिळते, जिला 39.2kWh लिथियम-आयन बॅटरीची जोड देण्यात आली आहे. ही कार 452km रेंज देऊ शकते. Hyundai Kona EV ची किंमत 23.79 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. हे देखील वाचा: एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ
5. BYD Atto 3
BYD लवकरच भारतीय बाजारात BYD Atto 3 सादर करून ईव्ही मार्केटमध्ये एक नवीन युद्ध छेडू शकते. BYD Atto 3 देखील एक कॉम्पॅक्ट EV SUV असेल की लवकरच CKD रूटच्या माध्यमातून भारतात येईल. BYD Atto 3 201bhp आणि 310Nm इलेक्ट्रिक मोटर आणि 60.5kWh बॅटरी पॅकसह बाजारात येऊ शकते. Atto 3 एकदा चार्ज केल्यावर 480km ची रेंज मिळू शकते. यात 6.6kW AC चार्जरच्या माध्यमातून 9.5 तासांत फुल चार्ज करता येईल. या ईव्ही एसयूव्हीमध्ये एलईडी हेडलॅम्प, 12.8 इंचाचा रोटेटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पाच इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पावर्ड फ्रंट सीट, वायरलेस चार्जर, एम्बिएंट लाइटिंग, 360 डिग्री कॅमेरा आणि सात एयरबॅग असतील. हिची आरंभिक किंमत Rs 25 lakh (ex-showroom) च्या आसपास असू शकते.