Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च

लेनोवो ​अधिकृत मोटोरोला ने गेल्यावर्षी आपल्या ‘ई’ स्मार्टफोन सीरीज अंतर्गत एक साथ तीन स्मार्टफोन मोटो ई5, मोटो ई5 प्लस आणि मोटो ई5 प्ले लॉन्च केले होते. मोटो ई सीरीजच्या 5व्या जेनेरेशन मध्ये सादर झालेले हे तिन्ही शानदार फोन लुक व डिजाईन सोबत दमदार स्पेसिफिकेशन्स आणि पावरफुल बॅटरी सह येतात. आता मोटोरोला या सीरीजला पुढे नेण्याची तयारी करत आहे. मोटोरोला लवकरच टेक मंचावर Moto E6 सीरीज सादर करेल. तसेच आज या सीरीजच्या एका स्मार्टफोन Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल एक्सडीए डेवलेपर्स ने ट्वीट केले आहे. या ट्वीट मध्ये Moto E6 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. टिपस्टर नुसार Moto E6 ला surfna कोडनेम देण्यात आले आहे आणि मोटोरोला लवकरच या स्मार्टफोनची घोषणा करू शकते. Moto E6 मोटोरोला ई सीरीजच्या सहाव्या जेनेरेशनचा हा फोन असेल. Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स या लीक मध्ये शेयर करण्यात आलेतच पण या फोन व्यतिरिक्त Motorola E6 सीरीज मध्ये आणि कोणते डिवाईस लॉन्च करेल, याबद्दल अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही.

Moto E6
मोटोरोला ई सीरीजच्या या नेक्स्ट जेन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक नुसार हा फोन 720 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक मध्ये स्पष्ट झाले नाही कि Moto E6 मध्ये कशाप्रकारची नॉच दिली जाईल. ट्वीट नुसार Moto E6 एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल.

Moto E6 बद्दल समोर आलेल्या ट्वीट नुसार हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 430 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हा चिपसेट क्वालकॉमचा जुना चिपसेट आहे, त्यामुळे जर असे झाले तर हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल. तसेच समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि Moto E6 मध्ये 2जीबी रॅम दिला जाऊ शकतो.

लीक नुसार Moto E6 कंपनी द्वारा दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. यात एक वेरिएंट 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 32जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E6 मध्ये 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सांगण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Moto E6 बद्दल या ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे कि मोटोरोला हा फोन लवकरच अमेरिकेत लॉन्च करणार आहे, त्यांनतर हा फोन इत्तर ठिकाणी येईल. Moto E6 सीरीजच्या इतर स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण Moto E6 समोर आल्यानंतर अशा आहे कि लवकरच या सीरीजचे इतर स्मार्टफोन समोर येतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here