मोटो जी7 चे स्पेसिफिकेशन्स लीक, वॉटरड्रॉप डिस्प्ले सह एंडरॉयड पाई वर चालेल

मोटोरोला ने गेल्या महिन्यात भारतात कंपनी च्या जी6 सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन मोटो जी6 प्लस लॉन्च केला होता. या फोन मध्ये 6जीबी रॅम आहे जो 22,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्मार्टफोन डिस्प्ले च्या बदलत्या ट्रेंड मध्ये मोटोरोला पण वॉटरड्रॉप डिस्प्ले वाला फोन आणायची तयारी करत आहे. एका ताज्या लीक मध्ये समोर आले आहे की मोटोरोला वॉटरड्रॉप डिस्प्लेची सुरवात मोटो जी7 स्मार्टफोन ने करेल. या लीक मध्ये फोन च्या डिजाईन-डिस्प्ले सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

मोटो जी7 च्या स्पेसिफिकेशन्स संबधित हा लीक एका टेक ब्लॉगर ने शेयर केला आहे. लीक नुसार मोटो जी7 में बेजल लेस डिस्प्ले असेल ज्याच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली वॉटरड्रॉप नॉच देण्यात येईल हा फोन 6.4-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. लीक नुसार मोटो जी7 एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई सह आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. या लीक मध्ये चिपसेटचा उल्लेख नाही.

लीक नुसार मोटो जी7 कंपनी 4जीबी रॅम सह सादर करू शकते ज्या सोबत या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज असेल. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. मोटोरोला मोटो जी7 चा अजून एक वेरिएंट सादर केला जाईल ज्यात 3जीबी रॅम सोबत 32जीबी स्टोरेज दिली जाईल असा अंदाज पण या लीक मध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी7 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर मिळू शकतो. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 12-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल. बोलले जात आहे की मोटो जी7 च्या कॅमेरा सेटअप मध्ये एआई टेक्नॉलजी असेल.

मोटो जी7 मधील फिंगरप्रिंट सेंसर या लीक मध्ये दिसत नाही. पण मोटो जी7 मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलजी असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएच ची बॅटरी असू शकते. मोटो जी7 जागासमोर यायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे फोन लॉन्च होई पर्यंत अनेक लीक्स येतील. त्यामुळे मोटो जी7 चे वरील स्पेसिफिकेशन्स हा फक्त अंदाज आहे असे आपण म्हणू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here