5,000mAh बॅटरी आणि एंडरॉयड 10 सह FCC आणि Wi-Fi सर्टिफिकेशन वर दिसला Moto G8 Power

मोटोरोलाचे दोन स्मार्टफोन्सचे मॉडेल नंबर XT2045-2 आणि XT2041-4 सह अनेक सर्टिफिकेशन्स साइट वर दिसले आहेत. रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि XT2041-4 मॉडेल नंबर डिवाइस Moto G8 पावर असेल जो यूएस FCC वर दिसला आहे. तसेच फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी असू शकते. या फोनचा मॉडेल नाव ‘KZ50’ आहे. Moto G8 Power बद्दल अफवा आहे कि फोनचे डायमेंशन 157.9mm x 75.8mm x 165mm असेल.

तसेच फोन मध्ये 6.2 आणि 6.3-इंचाचा डिस्प्ले असू शकतो. रिपोर्टनुसार Moto G8 Power चे कोडनेम ‘Sofia’ असेल आणि हा SM6125 SoC म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट सह सादर केला जाईल. Motorola XT2041-4 पेक्षा वेगळा Wi-Fi Alliance सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे जो एंडरॉयड 10 आणि डुअल-बॅंड Wi-Fi सह येईल.

दुसरीकडे मोटोरोलाचा दुसरा मॉडेल XT2045-2 मॉडेल नंबर सह Eurasian Economic Commission (EEC) डाटाबेस मध्ये दिसला आहे जो 2020 मध्ये येऊ शकतो. क्वालकॉम समिट मध्ये मोटोरोलाने घोषणा केली आहे कि कंपनी लेटेस्ट क्वालकॉम 765/765G आणि स्नॅपड्रॅगॉन 865 SoC सह फोन्स सादर करेल त्यामुळे अश्या व्यक्त करण्यात येत आहे कि XT2045-2 कंपनीचा पहिला 5जी डिवाइस असेल.

अलीकडेच मोटोरोलाने मोटो One Hyper स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा डिवाइस कंपनीचा पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला हँडसेट आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5-इंचाची एलसीडी आईपीएस स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यात आस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. तसेच चांगल्या परफॉर्मेंस साठी स्नॅपड्रॅगॉन 675 एसओसी सह 4जीबी रॅम सपोर्ट पण देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे, जी एक टीबी पर्यंत वाढवता येते.

यूजर्सना या फोनच्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे. तसेच या फोनचे यूजर्स 32 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याने शानदार सेल्फी क्लिक करू शकतील. कंपनीने या फोन मध्ये कनेक्टिविटी साठी ब्लूटूथ, वाई-फाई, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी असे फीचर्स दिले आहेत तसेच यूजर्सना फास्ट चार्जिंगचे फीचर पण मिळेल. हा फोन एंड्रॉयड 10 मोटोरोला स्किन वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here