सॅमसंगच्या हद्दीत मोटोचा राडा! दोन-दोन डिस्प्लेसह लाँच केला Moto Razr 2022 फोल्डेबल स्मार्टफोन

फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या बाबतीत सॅमसंग आघाडीवर आहे. कंपनीनं परवाच दोन नवीन फोल्डेबल बाजारात आणले आहेत. आता या सेगमेंटमध्ये सॅमसंगला Motorola कडून आव्हान मिळणार असं दिसतंय. कंपनीनं आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा लेटेस्ट Moto Razr 2022 स्मार्टफोन सॅमसंगच्या Galaxy Z Flip 4 लाँचच्या दुसऱ्याच दिवशी मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. मोटोरोलाचा नवीन फोल्डेबल Razr 2022 स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसर, 50 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा, दोन डिस्प्ले आणि कंपनीच्या लेटेस्ट क्लॅमशेल रेजर डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला Moto Razr 2022 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्ससह किंमतीची माहिती देणार आहोत.

Moto Razr 2022 चे स्पेसिफिकेशन्स

Moto Razr 2022 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. जो सध्या बाजारात उपलब्ध असलेला सर्वात शक्तिशाली चिपसेट आहे. सोबतीला 12GB रॅमची ताकद देण्यात आली आहे. मोटोरोलाचा हा फोन 512GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. Moto Razr 2022 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HDR10+ आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Razr 2022 स्मार्टफोनमध्ये 2.7-इंचाचा आउटर डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा वापर नोटिफिकेशन्ससाठी करता येईल. तसेच रियर कॅमेऱ्यानं सेल्फी क्लिक करताना या डिस्प्लेचा वापर व्यू फाईंडर म्हणून करता येईल. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Moto Razr 2022 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जोडीला 13 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 32 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: सर्वांची सुट्टी करण्यासाठी मोटोरोला सज्ज! किफायतशीर किंमतीत 12GB RAM आणि 144Hz डिस्प्लेसह Moto S30 Pro लाँच

लेटेस्ट Razr स्मार्टफोन Android 12 वर आधारित Motorola च्या MyUI 4.0 स्किनवर चालतो. Moto Razr 2022 स्मार्टफोनमध्ये 3,500 mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर, डॉल्बी अ‍ॅटमोसला सपोर्ट आणि कनेक्टिव्हिटीसाठी 19 5G बँड, 4G, Wi-Fi 6E, Bluetooth सपोर्ट मिळतो. हे देखील वाचा: लाँच झाला स्वस्त 50MP कॅमेरा असलेला 5G मोबाईल, Jio युजर्सना मिळणार 5000 रुपयांचा फायदा

Moto Razr 2022 ची किंमत

Moto Razr 2022 स्मार्टफोनचा बेस मॉडेल 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 5,999 युआन (सुमारे 70,950 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत अनुक्रमे 6,499 युआन (सुमारे 76,850 रुपये) आणि 7,299 युआन (सुमारे 86,300 रुपये) आहे. भारतात लवकरच हा फोन सादर केला जाईल शकतो. परंतु चीनमध्ये या फोनची बुकिंग सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here