ह्याच महिन्यात लाँच होऊ शकतो Motorola Edge 40; मिळू शकतो 68W फास्ट चार्जिंग

Highlights

 • Motorola Edge 40 मध्ये MediaTek Dimensity 8020 SoC असू शकतो.
 • फोन भारतात येण्यापूर्वी जागतिक बाजारात आला आहे.
 • भारतात Motorola Edge 40 ची किंमत 40,000 रुपये असू शकते.

Motorola Edge 40 काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला होता. आता ह्या फोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे. टिप्सटर अभिषेक यादवनुसार, हा प्रीमियम मिड-रेंज फोन ह्याच महिन्यात भारतात येईल. तसेच Motorola Edge 40 स्मार्टफोन MediaTek Dimensity 8020 SoC, pOLED डिस्प्ले आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.

मोटोरोला एज 40 ची किंमत (संभाव्य)

Motorola Edge 40 ग्लोबल मार्केटमध्ये EURO 599.99 (जवळपास 54,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला होता. तर भारतात या फोनची किंमत 40,000 रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन

मोटोरोला एज 40 चे स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल व्हेरिएंट)

 • pOLED Panel
 • 6.55″ FHD+ Display
 • 144Hz Refresh Rate

Motorola Edge 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारखे फीचर्स मिळतात.

 • LPDDR4X RAM
 • UFS 3.1 storage
 • MediaTek Dimensity 8020

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 8020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

 • 50MP Rear Camera
 • 32MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलची मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

 • 4,400mAh battery
 • 68W wired charging
 • 15W wireless charging

पावर बॅकअपसाठी मोटोरोला एज 40 स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. तसेच हा मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 12GB RAM सह Vivo S17e ची एंट्री; जाणून घ्या किंमत

मोटोरोला एज 40 चे बेस्ट फीचर्स

Motorola Edge 40 मध्ये 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आहे जी स्क्रीनच्या खाली आहे. Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे त्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टेंट बनतो. फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसद्वारे ट्यून्ड ड्युअल स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here